ऍपल इव्हेंट 2019 : टीव्ही प्लस, न्यूज प्लस, कार्ड, आर्केड जाहीर

apple-stage
apple-stage

कॅलिफोर्निया - नुकताच ऍपल इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये बर्‍याच गोष्टी जाहीर करण्यात आल्या असून, यामधील ठळक गोष्टी म्हणजे ऍपल न्यूज प्लस, ऍपल आर्केड, ऍपल कार्ड, ऍपल टीव्ही चॅनल्स व ऍपल टीव्ही प्लस

ऍपल न्यूज प्लस :
पूर्वीच्या मोफत ऍपल न्यूजमध्ये मॅगॅझीन्ससारख्या गोष्टींची जोड देऊन आता सबस्क्रिप्शनच्या रूपात ही सेवा सादर करण्यात आली आहे. यासाठी दरमहा $9.99 (670 रुपये) द्वावे लागणार आहेत. सध्या अमेरिका व कॅनडामध्येच ही सेवा उपलब्ध असेल. यामध्ये फॅमिली शेयरिंग सुविधा देखील देण्यात आली आहे. ज्यामुळे त्याअंतर्गत जोडलेल्या अकाऊंट्सवरही एकाच सबस्क्रिप्शनद्वारे बातम्या, मॅगॅझीन्स वाचता येतील. याचा पहिला महिना पूर्ण मोफत असणार आहे. या सेवेमध्ये मॅगझिन्सचे कव्हर ‘लाईव्ह कव्हर’ प्रकारच पाहायला मिळेल जे काही सेकंदाच्या व्हिडिओ/ ऍनिमेशन स्वरूपात दिसतील. सबस्क्रायबर्सना जवळपास ३०० मॅगझिन्स उपलब्ध असतील. यामध्ये ऍपलने वॉल स्ट्रीट जर्नल, लॉस एंजेलिस टाइम्स सारख्यांसोबत भागीदारीही करण्यात आलेली आहे.

ऍपल आर्केड :
यामध्ये गेमिंग सबस्क्रिप्शन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खास बनवलेल्या 100+ गेम्सचा यामध्ये समावेश असणार आहे. हे गेम्स आयफोन, आयपॅड, ऍपल टीव्ही, मॅक कम्प्युटर अशा सर्वच उत्पादनांवर ऑफलाइन खेळता येतील. या सेवेची फी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

ऍपल कार्ड :
ही सेवा आयफोनवर उपलब्ध असेल आणि हे कार्ड डिजिटली फोनवर वॉलेटमध्ये साठवलेल असेल. यामध्ये आपण स्टेटमेंट, बॅलन्स, पेमेंटच्या तारखा पाहू शकाल. या कार्डसाठी कोणत्याही CVV, कार्ड नंबर, एक्सपायरी डेटची गरज नाही. हे कार्ड गोल्डमन सॅच आणि मास्टरकार्ड यांच्या सहकार्याने बनवलेल असेल. हे वापरल्यास 2 टक्के कॅशबॅकचीही सोय करण्यात आली आहे. यासोबत तुम्ही हवे असल्यास खरे कार्डही मागवु शकाल जे टायटॅनियमपासून तयार केले आहे. आणि यावर ऍपल लोगो, तुमचं नाव आणि चीप दिसेल. हवी असलेली माहिती ऍप उघडून पाहू शकाल. ही सेवा भारतात कधी उपलब्ध होणार याबाबत मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही.

ऍपल टीव्ही चॅनल्स :
या अपडेटनुसार ऍपल टीव्हीमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या चॅनल्सची निवड करता येईल. ही सोय तूर्तास अमेरिकेतील ग्राहकांना मिळेल. HBO, PBS, CBS, इ प्रसिद्ध वाहिन्यांची निवड करून तेव्हढ्याच वाहिन्यांचे पैसे देता येतील. याच्याही किमतीची माहिती देण्यात आलेली नाही.

ऍपल टीव्ही प्लस :
सर्वात चर्चेचा विषय ठरलेली ही सेवा आहे. ऍपलच्या स्वतःचे टीव्ही प्रोग्रॅम्स यामध्ये असणार आहेत. परंतु, अद्याप यामध्ये कोणते चित्रपट/मालिका येथे उपलब्ध होतील याची फारशी माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यामधील कंटेंट ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही स्वरुपात पाहता येऊ शकणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com