Flipkart : लॅपटॉप मागवला, मिळालं कपडे धुण्याचे साबण; फ्लिपकार्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

big billion days sale

लॅपटॉप मागवला, मिळालं कपडे धुण्याचे साबण; फ्लिपकार्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये

ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यानंतर अशा प्रकारच्या खरेदीच्यावेळी फसवणूक होण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. अशा घटना दररोज समोर येतात आणि यामुळेच ग्राहकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल सुरू आहे आणि त्याच्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. फेस्टीव्हल सेलमध्ये महागड्या लॅपटॉपची ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाला कंपनीकडून घडी या साबणाची डिलिव्हरी मिळाली आहे आणि यासाठी फ्लिपकार्टनेच ग्राहकाला जबाबदार धरले आहे.

फ्लिपकार्ट सेल दरम्यान झालेल्या फसवणूकीबाबत यशस्वी शर्मा नावाच्या ग्राहकाने लिंक्डइनवर माहिती दिली आहे. यशस्वी यांनी सांगितले की त्यांनी फ्लिपकार्टवरून वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केला होता, ज्याची डिलिव्हरी घेतल्यानंतर त्यांना लॅपटॉप बॉक्समध्ये डिटर्जंट साबण आढळले आहेत. लिंक्डइन पोस्टमध्ये, त्याने एक फोटो देखील शेअर केला आणि म्हटले की फ्लिपकार्ट आपली चूक मान्य करण्यास नकार देत आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लगेच बॉक्स उघडला नाही..

यशस्वीने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले की, बिग बिलियन डेज सेल दरम्यान त्याने लॅपटॉप ऑर्डर केला. या लॅपटॉपची डिलिव्हरी घेताना त्याच्या वडिलांनी डिलिव्हरी बॉयसमोर लगेच बॉक्स उघडला नाही. नंतर पॅकेज उघडल्यावर आतमध्ये घडी साबण सापडला. कस्टमर केअरकडे याबाबत तक्रार केल्यानंतर फ्लिपकार्टने त्यांनाच जबाबदार धरले आणि कंपनी आता या प्रकरणात काहीही करू शकत नाही आणि त्यांनी 'ओपन बॉक्स डिलिव्हरी' घ्यायला हवी होती, असे सांगितले.

हेही वाचा: Flipkart Sale : iPhone 13 च्या ऑर्डर आपोआप रद्द होतायत? कंपनी म्हणतेय की..

फ्लिपकार्ट म्हणते ग्राहकच जबाबदार

शॉपिंग प्लॅटफॉर्मने ग्राहकाला जबाबदार धरले की त्यांनी ओपन-बॉक्स डिलिव्हरी घ्यायला हवी होती. म्हणजेच डिलिव्हरी बॉयला वन टाईम पासवर्ड (ओटीपी) सांगण्यापूर्वी त्याने बॉक्स उघडून त्याच्यापर्यंत योग्य उत्पादन पोहोचले आहे की नाही हे पाहावे. तथापि, बहुतेक ग्राहकांना या सिस्टीमबद्दल माहिती नसते आणि डिलिव्हरी एजंट अनेकदा उत्पादन वितरण करण्यापूर्वीच ओटीपी मागतात.

यशस्वी यांनी म्हटले की, त्यांच्याकडे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आहे, ज्यावरून डिलिव्हरी देताना बॉक्स उघडला नसल्याचे दिसून येते.ते म्हणाले की, ओटीपी मागण्यापूर्वी डिलिव्हरी बॉयने स्वतः बॉक्स दाखवायला हवा होता आणि ती त्याची जबाबदारी आहे. यशस्वी म्हणतात की त्याच्या वडिलांना ओपन-बॉक्स कंसेप्टबद्दल माहिती नव्हती आणि फ्लिपकार्टवर विश्वास ठेवणे ही त्यांची चूक ठरली.

हेही वाचा: Jio Phone 5G: 'जिओ'च्या पहिल्या 5G फोनची किंमत उघड! 'या' फीचर्ससह होणार लॉंच

ग्राहकाने पोस्टच्या टिप्पण्यांमध्ये काही अद्यतने शेअर केली आणि सांगितले की त्याच्या एका नातेवाईकाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, त्यांच्याशी बोलल्यानंतर, फ्लिपकार्ट टीमने रिफंड जारी करण्याबद्दल माहिती दिली असून रक्कम मात्र त्यांच्या खात्यात मिळालेले नाही. तसेच ग्राहकाकडून दावा केला आहे की ज्या डिलिव्हरी बॉयने त्याचा लॅपटॉप आणला त्याला देखील ओपन-बॉक्स कंसेप्टबद्दल माहिती नव्हती.

कंपनीचे काय म्हणणे आहे?

या प्रकरानंतर फ्लिपकार्टने स्पष्टिकरण दिले आहे. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहक-केंद्रित संस्था म्हणून फ्लिपकार्ट ग्राहकांच्या विश्वासाला सर्वोच्च प्राधान्य देते. आमच्या ग्राहकांना शक्य तितका सर्वोत्कृष्ट ऑनलाइन खरेदी अनुभव सुनिश्चित करणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय ऑफर केलेल्या या विशिष्ट प्रकरणात, ग्राहकाने पॅकेज न उघडता डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हसोबत OTP शेअर केला. घटनेच्या तपशीलांची पडताळणी झाल्यानंतर, आमच्या ग्राहक सेवा टीमने पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु केली. जी ३-४ दिवसांत पूर्ण होईल.

आम्ही समस्या ओळखली आहे आणि चुकीच्या विक्रेत्यावर कारवाई देखील सुरू केली आहे. फ्लिपकार्टचा ओपन बॉक्स डिलिव्हरी हा ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी समर्पित उपक्रम आहे. ओपन बॉक्स डिलिव्हरी प्रक्रियेचा एक भाग म्हणून, फ्लिपकार्ट विशमास्टर्स (डिलिव्हरी पार्टनर) ग्राहकासमोर डिलिव्हरीच्या वेळी उत्पादन उघडतात. ग्राहकांनी त्यांच्या ऑर्डर अखंड स्थितीत असतानाच डिलिव्हरी स्वीकारणे आवश्यक आहे आणि नंतर OTP शेअर करणे आवश्यक आहे. हे ग्राहकाच्या कोणत्याही आर्थिक दायित्वास प्रतिबंध करते. ग्राहकांचा एकूण अनुभव सुधारण्यासाठी आणि एक उत्कृष्ट पुरवठा साखळी तयार करण्यासाठी फ्लिपकार्टने गेल्या काही वर्षांत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचा हा भाग आहे.

टॅग्स :flipkart