Smart TV Offer: मस्तच! अवघ्या ८ हजारात खरेदी करा ५० इंच स्मार्ट टीव्ही, बंपर ऑफरचा मिळेल फायदा

फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग बचत धमाल सेलमध्ये ५० इंच, ५५ इंच स्क्रीनसह येणारे शानदार स्मार्ट टीव्ही स्वस्तात उपलब्ध आहेत.
Smart TV
Smart TV Sakal

Offer On Smart TV: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सध्या बिग बचत धमाल सेल सुरू आहे. या सेलमध्ये Blaupunkt, Realme, Mi आणि Vu सारख्या कंपन्यांचे शानदार स्मार्ट टीव्ही स्वस्तात उपलब्ध आहेत. सेलमध्ये तुम्ही ५० इंच, ५५ इंचचे टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टचा हा सेल ८ जानेवारीपर्यंत चालेल. सेलमध्ये बंपर डिस्काउंटसह मिळणाऱ्या या स्मार्ट टीव्हींविषयी सविस्तर जाणून घ्या.

Smart TV
Smartphone Offer: अवघ्या 2 हजारात मिळतोय 108MP कॅमेऱ्यासह येणारा स्मार्टफोन, ऑफर एकदा पाहाच

Blaupunkt Cybersound 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

Blaupunkt च्या ५० इंच स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ४७,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही डिस्काउंटनंतर २८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर १८,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि ३ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफरचा फायदा मिळेल.

realme 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

या ५० इंच स्मार्ट टीव्हीला फक्त २८,९९९ रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. टीव्हीची मूळ किंमत ४२,९९९ रुपये आहे. यावर १६,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि ३ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास हा टीव्ही फक्त ९,०९९ रुपयात तुमचा होईल.

SENS Pikaso 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

४८,६९० रुपये किंमतीच्या या स्मार्ट टीव्हीला तुम्ही फक्त २४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि ३ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहे.

Infinix X3 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

इनफिनिक्सच्या या ५० इंच स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ३९,९९९ रुपये आहे. मात्र, फ्लिपकार्ट सेलमध्ये हा टीव्ही फक्त २६,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यावर ११ हजार रुपये एक्सचेंज ऑफर आणि ३ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफरचा फायदा मिळाल्यास टीव्हीला १२,९९९ रुपयात घरी घेऊन जाऊ शकता.

Mi X Series 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

४५ हजारांचा ५० इंच स्मार्ट टीव्ही फक्त १५,०९९ रुपयात तुमचा होऊ शकता. यावर १६,९०० रुपये एक्सचेंज ऑफर आणि ३ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहे. ऑफरशिवाय टीव्ही ३४,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

हेही वाचा: Auto Expo 2023: MG ची शानदार इलेक्ट्रिक कार भारतात करणार एंट्री, सिंगल चार्जमध्ये पूर्ण शहर फिरता येईल

Vu 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart WebOS TV

Vu च्या ५५ इंच स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ६५,००० रुपये आहे. मात्र, सेलमध्ये फक्त ३० हजारात उपलब्ध आहे. यावर १६,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि ३ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफरचा देखील फायदा मिळेल.

SENS Pikaso 140 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

फ्लिपकार्ट सेलमध्ये या ५५ इंच स्मार्ट टीव्हीला फक्त २९,९९९ रुपयात खरेदी करता येईल. यावर ११ हजार रुपये एक्सचेंज ऑफर, ३ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफरचा फायदा मिळेल. दोन्ही ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास हा टीव्ही फक्त १५,९९९ रुपयात तुमचा होईल.

KODAK 7XPro 139 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

४७ हजारांचा हा ५५ इंच स्मार्ट टीव्ही सेलमध्ये ३०,९९९ रुपयात उपलब्ध आहे. याशिवाय, ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि ३ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफर मिळाल्यास टीव्हीला १६,९९९ रुपयात खरेदी करता येईल.

Mi X Series 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

एमआयचा हा मोठ्या स्क्रीनसह येणारा टीव्ही फक्त ३९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. टीव्हीवर एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर देखील उपलब्ध आहे.

Coocaa 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV

Coocaa च्या ५५ इंच स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ७३,९९० रुपये आहे. परंतु, तुम्ही फक्त ३२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि ३ हजार रुपयांपर्यंत बँक ऑफरचा देखील फायदा मिळेल.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com