Flipkart Smartphone Offers : वर्षाच्या शेवटी फ्लिपकार्टचा धमाका! पाच फ्लॅगशिप स्मार्टफोनवर मिळतोय तगडा डिस्काउंट

Flipkart Year Ender Sale : आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा डिस्काउंट मिळणाऱ्या पाच फ्लॅगशिप फोनची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
Flipkart Smartphone Offers
Flipkart Smartphone OfferseSakal

2023 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. यातच फ्लिपकार्टने आपल्या ईयर एंडर सेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या सेलमध्ये वर्षभरात लाँच झालेल्या तगड्या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे.

आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा डिस्काउंट मिळणाऱ्या पाच फ्लॅगशिप फोनची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. विशेष म्हणजे ज्या ग्राहकांकडे बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी आणि पीएनबी बँकांचे कार्ड आहेत, त्यांना खरेदीवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे.

आयफोन 14

iPhone 14 ची मूळ किंमत ही 69,900 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा फोन केवळ 58,999 रुपयांना उपलब्ध आहे. सोबतच HDFC क्रेडिट कार्ड यूजर्सना यावर आणखी 500 रुपये सूट मिळत आहे. एक्स्चेंज ऑफर अंतर्गत यावर 34,500 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो.

Flipkart Smartphone Offers
Realme C67 5G : 15 हजारांच्या स्मार्टफोनमध्ये आयफोनचं फीचर; रिअलमीने करुन दाखवलं!

Samsung Galaxy Z Fold 5

सॅमसंगच्या या फोल्डिंग फोनची किंमत 1,54,999 रुपये आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये हा फोन 1,45,999 रुपयांना मिळत आहे. HDFC कार्ड यूजर्सना हा 9,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. याव्यतिरिक्त एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर 44,500 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

गुगल पिक्सेल

Google Pixel 7A या स्मार्टफोनची मूळ किंमत 43,999 रुपये आहे. याला फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही 37,999 रुपयांना खरेदी करू शकता. PNB क्रेडिट कार्ड होल्डर्सना यावर अतिरिक्त 1,000 रुपयांची सूट मिळत आहे.

Flipkart Smartphone Offers
Realme GT5 Pro : टच करण्याचीही गरज नाही, केवळ हाताच्या इशाऱ्यांनी वापरता येणार हा स्मार्टफोन; भारतात कधी येणार?

मोटो

Motorola Edge 40 या फोनची मूळ किंमत 29,999 रुपये आहे. याला सेलमध्ये 25,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. PNB बँकेचे कार्ड वापरल्यास यावर आणखी 1,000 रुपये सूट मिळू शकते.

रेडमी

बजेट सेगमेंटमध्ये Redmi 12 या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या फोनची मूळ किंमत 10,999 रुपये आहे. मात्र, सेलमध्ये हा केवळ 9,899 रुपयांना खरेदी करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com