esakal | भारतात कार निर्मिती बंद; फोर्डच्या निर्णयाने मेक इन इंडियाला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

भारतात कार निर्मिती बंद; फोर्डच्या निर्णयाने मेक इन इंडियाला फटका

फोर्ड कंपनी ही अशी एकमेव कंपनी होती जी भारतात कार निर्मिती करून अमेरिकेत त्याची निर्यात करत होती.

भारतात कार निर्मिती बंद; फोर्डच्या निर्णयाने मेक इन इंडियाला फटका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - अमेरिकन कार कंपनी फोर्डने भारतातील कार निर्मिती बंद करणार असल्याची घोषणा केली. गुरुवारी कंपनीने सांगितलं की, भारतीय बाजारात स्थान मिळवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. फोर्ड कंपनी आता भारतात कार निर्मिती करणार नाही. यामुळे भारत सरकारच्या मेक इन इंडिया योजनेला फटका बसल्याचं म्हटलं जात आहे. याआधीही दोन कंपन्यांनी त्यांचे भारतातील उत्पादन बंद केले आहे.

गेल्या वर्षी हार्ली डेविडसनने असाच निर्णय घेतला होता. तर २०१७ मध्ये जनरल मोटर्सने भारतातील काम बंद केलं होतं. फोर्ड कंपनीने म्हटलं की, दहा वर्षांत त्यांना दोन अब्ज डॉलर्सहून जास्त नुकसान सहन करावं लागलं आहे. २०१९ मध्ये त्यांचे ८० कोटी डॉलर्सने नुकसान झाले.

हेही वाचा: 'अमेरिका, चीनची स्पर्धा व्हावी पण...' बायडेन-जिनपिंग फोनवर चर्चा

भारतातील कंपनीचे अध्यक्ष अनुराग मेहरोत्रा यांनी सांगितलं की, बराच काळ आम्ही नफा कमावण्यासाठी धडपड केली. मात्र त्यात यश आले नाही. कंपनीला आशा आहे की कंपनी पुन्हा उभारण्यासाठी दोन अब्ज डॉलर्सचा खर्च येईल. यामध्ये ६० कोटी याचवर्षी खर्च होतील. तर पुढच्या वर्षी १२ अब्ज डॉलर खर्च होईल.

फोर्डने भारतात वाहन निर्मिती बंद केली आहे. त्यांचा कारखाना पश्चिम गुजरातमध्ये असून तिथे निर्यातीसाठी कार तायर केल्या जातात. वर्षाअखेरपर्यंत कारखान्यातील काम बंद केलं जाईल. फोर्डचे इंजिन आणि कार्स असेंबल करणारे कारखाने चेन्नईत आहेत. ते कारखाने पुढच्या वर्षी दुसऱ्या तिमाहीपर्यंत बंद केले जातील. फोर्डच्या या निर्णय़ामुळे ४ हजारहून कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. फोर्ड कंपनी ही अशी एकमेव कंपनी होती जी भारतात कार निर्मिती करून अमेरिकेत त्याची निर्यात करत होती.

loading image
go to top