एक एप्रिलपासून 'ही' उपकरणे महागणार! जाणून घ्या किती वाढणार किमती

from April 1 some electronics items may get cheaper or expensive check details
from April 1 some electronics items may get cheaper or expensive check details

अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून जवळपास दोन आठवडे झाले आहेत. दरम्यान अर्थसंकल्पीय भाषणात देशांतर्गत उत्पादन वाढीस चालणा देण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. यात विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स उत्पादन वाढीला वाव मिळावा याकडे विषेश लक्ष देण्यात आले. यूएसची अकाउंटिंग फर्म 'ग्रँट थॉर्नटन'च्या मते, 1 एप्रिल 2022 पासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर प्रस्तावित आयात करामुळे त्याची उत्पादन किंमत महाग किंवा स्वस्त होऊ शकते. त्यामुळे स्मार्टफोन, हेडफोन इत्यादींसाठी तुम्हाला कमी किंवा जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

स्मार्टफोन

सरकारने मोबाईल फोन चार्जरच्या ट्रान्सफॉर्मर पार्ट्स, मोबाईल कॅमेरा मॉड्यूल्सच्या कॅमेरा लेन्स आणि इतर अॅक्सेसरीजवर 5 ते 12.5% ​​कस्टम ड्युटी सवलत दिली आहे. त्यामुळे स्मार्टफोन बनवण्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी होईल. त्यामुळे स्मार्टफोन स्वस्त होतील, याचा फायदा वापरकर्त्यांना होऊ शकतो.

स्मार्टवॉच, फिटनेस बँड

येत्या काही दिवसांमध्ये स्मार्टवॉचचे काही भाग स्वस्त होण्याची शक्यता आहे, त्यांना 31 मार्च 2023 पर्यंत कस्टम ड्यूटीमध्ये सूट मिळणे सुरू राहील. यामुळे उत्पादन किमतीत कमी होईल आणि त्यामुळे स्मार्टवॉचच्या किमती घसरतील. याचा फायदा सामान्य ग्राहकांना होणार आहे.

from April 1 some electronics items may get cheaper or expensive check details
Xiaomi ने लॉंच केला फक्त 250 ग्रॅम वजनाचा मिनी पीसी; पाहा किंमत

वायरलेस इअरबड्स महागणार?

वायरलेस इअरबड्सच्या मॅन्यूफॅक्चरिंग मध्ये वापरल्या जाणार्‍या पार्ट्सवर सरकारकडून आयात शुल्क वाढविण्यात आले आहे आणि यामुळे उत्पादन खर्च वाढू शकतो. वापरकर्त्यांना वायरलेस इयरबड, नेकबँड हेडफोन आणि इतर तत्सम गॅझेटसाठी जास्त पैसे द्यावे लागू शकतात.

प्रीमियम हेडफोन्स

हेडफोन्सच्या थेट आयातीवर आता 20% जास्त शुल्क आकारले जाईल, याचा अर्थ असा होतो की ग्राहकांना त्यांच्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.

from April 1 some electronics items may get cheaper or expensive check details
Asus चे दोन पॉवरफुल गेमिंग स्मार्टफोन्स भारतात लॉंच, पाहा फीचर्स

रेफ्रिजरेटर

कॉम्प्रेसरमध्ये वापरल्या जाणार्‍या पार्ट्सच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. याचा अर्थ देशात रेफ्रिजरेटरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

किमतीतील हे सर्व बदल कधीपासून लागू केला जाऊ शकतो याबद्दल सांगायचे झाल्यास, बजेटमध्ये करण्यात आलेल्या घोषणा या 1 एप्रिलपासून लागू होतील. कंपन्या नवीन फायदे वापरकर्त्यांना देतात की नाही यावरुन काही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची किंमत एक एप्रिलपासून कमी होऊ शकते.

from April 1 some electronics items may get cheaper or expensive check details
Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com