Xiaomi ने लॉंच केला फक्त 250 ग्रॅम वजनाचा मिनी पीसी; पाहा किंमत

xiaomi ningmei mini computer cr80 weight just 250g launch check price specification and other details
xiaomi ningmei mini computer cr80 weight just 250g launch check price specification and other details

Xiaomi कंपनीने अवघ्या 250 ग्रॅम वजनाचा नवा पीसी लॉन्च केला आहे, ज्याचे नाव Ningmei Mini Computer 'CR80' आहे. या मिनी पीसीला तुमचा मॉनिटर, कीबोर्ड आणि माऊस जोडून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. विशेषत: नॉन-गेमर वापरकर्त्यांसाठी, हा मिनी कंप्युटर (Mini Computer) खूप उपयुक्त ठरू शकतो. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये तुम्हाला N5105 क्वाड-कोर मिळते. तसेच यात हाय-स्पीड M.2 SSD आणि DDR4 मेमरी आहे. या मिनी कॉम्प्युटरचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत वाढवता येते.

Xiaomi Ningmei Mini PC 'CR80' किंमत

Mydrivers च्या रिपोर्टनुसार , Ningmei Mini Computer 'CR80' दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे, 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेजची किंमत CNY 1,099 (अंदाजे रुपये 13,053) आहे. त्याच वेळी, 8 GB RAM आणि 256 GB स्टोरेजची किंमत CNY 1,299 (अंदाजे रुपये 15,429) आहे.

xiaomi ningmei mini computer cr80 weight just 250g launch check price specification and other details
Asus चे दोन पॉवरफुल गेमिंग स्मार्टफोन्स भारतात लॉंच, पाहा फीचर्स

Xiaomi Ningmei Mini PC 'CR80' चे स्पेसिफिकेशन्स

Ningmei Mini Computer 'CR80' चे वजन फक्त 250 ग्रॅम आहे, याचा म्हणजे हे कंप्युटर तुमच्या स्मार्टफोनपेक्षा किंचित जड असेल. त्याच वेळी, त्याची लांबी 12cm पेक्षा थोडी कमी आहे आणि रुंदी 2.5cm पेक्षा थोडी कमी आहे. आपण ते सहजपणे बॅकपॅकमध्ये ठेवू शकता. यामध्ये N5105 क्वाड-कोर देण्यात आले आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2.9GHz पर्यंत टर्बो फ्रिक्वेन्सी मिळते. यामध्ये तुम्हाला 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळते, जे microSD कार्डद्वारे 512 GB पर्यंत वाढवता येते.

xiaomi ningmei mini computer cr80 weight just 250g launch check price specification and other details
Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

हा मिनी पीसी तुम्ही मॉनिटर, कीबोर्ड आणि माऊसशी कनेक्ट करून वापरू शकता. याशिवाय तुम्ही तो टीव्ही, प्रोजेक्टर, प्रिंटर, स्कॅनर इत्यादींशीही कनेक्ट करू शकता. हा पीसी फक्त 10 वॅट पॉवर वापरतो. तसेच कनेक्टिव्हिटीमध्ये Intel AC7265 वायरलेस नेटवर्क कार्ड दिली आहे, जे 2.4G + 5G ड्युअल बँड वाय-फाय कनेक्शनला सपोर्ट करते.

xiaomi ningmei mini computer cr80 weight just 250g launch check price specification and other details
आधार कार्डमध्ये जन्मतारीख चूकलीय? घरबसल्या करा दुरुस्त, पाहा प्रोसेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com