Intelligent Robot: 'चिट्टी'एवढाच बुद्धिमान रोबोट तयार, माणसांनाही टाकेल मागे

सांगितलेली सर्व कामं करणारा असाच एक रोबोट खरोखरच हवा होता, असं कित्येकांना वाटतं.
Intelligent Robot Garmy
Intelligent Robot GarmyeSakal

तुम्ही रजनीकांतचा रोबोट हा चित्रपट पाहिला असेल, तर त्यातील चिट्टीबाबू तुम्हाला नक्कीच आठवत असेल. सांगितलेली सर्व कामं करणारा असाच एक रोबोट खरोखरच हवा होता, असं कित्येकांना वाटतं. मात्र, ही कल्पना आता सत्यात उतरली आहे. जर्मनीच्या एका कंपनीने असाच एक रोबोट बनवला आहे.

खोलीत बसून तुम्ही पाणी मागाल आणि रोबोट ते स्वयंपाकघरातून आणून देईल. शिवाय तुम्हाला वेळेवर औषध, जेवायला देईल. आवश्यक असल्यास, तुमची तपासणी देखील करेल आणि इमर्जन्सी कॉल देखील करेल. विशेषत: ते वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेली कामे करेल. त्यावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी त्याला गार्मी (Garmy) असं नाव दिलंय. आगामी काळात हा जगातील सर्वात बुद्धिमान रोबोट असेल, असा दावा त्यांनी केला आहे.

Intelligent Robot Garmy
Robotics : रोबोटने केली शस्त्रक्रिया; २५ वर्षीय तरुणाला जीवदान

जर्मनीची म्युनिक इन्स्टिट्यूट ऑफ रोबोटिक्स हे Garmy रोबोट विकसित करत आहे. जे येणाऱ्या काळात वृद्धांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. हा रोबो दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली सर्व कामे करेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे जर्मन डॉक्टर गुएंटर स्टीनबॅख म्हणतात की हे वाटते तितके सोपे नाही. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रोबो माणसांप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतील यासाठी तासनतास प्रशिक्षण आणि प्रोग्रामिंग केले जाते.

Intelligent Robot Garmy
AI Robot for Housework: गृहीणींनो खुशखबर! २०३० पर्यंत AI रोबोट करेल घरातली ४०% कामं, AI तज्ञांचा खुलासा

सध्या Garmy रोबोटच्या हालचालीवर काम केले जात आहे, DW च्या रिपोर्टनुसार, रोबोटचे प्रोग्रामिंग अशा प्रकारे केले जात आहे की तो मनुष्याप्रमाणे हात हलवू शकेल, कारण जोपर्यंत तो असे करू शकत नाही, तो माणसांप्रमाणे वागूही शकत नाही.

सध्या, जपानमध्ये एक पेपर रोबोट आहे जो वृद्धांची काळजी घेण्यासाठी वापरला जातो. हा एक अतिशय प्राथमिक रोबोट आहे जो फक्त जपानी बोलू शकतो आणि काही क्रियाकलाप करू शकतो. याशिवाय एक रिबा रोबोट देखील आहे जो नर्सिंग स्टाफला मदत करत आहे. शास्त्रज्ञांचा दावा आहे की Garmy या सर्वांपेक्षा खूपच चांगला असेल, जो पूर्णपणे मानवासारखा असेल.

Intelligent Robot Garmy
Elon Musk Robot Wives : इलॉन मस्ककडे आहेत रोबोट वाईव्हज्? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com