Robotics | रोबोटने केली शस्त्रक्रिया; २५ वर्षीय तरुणाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robotics

Robotics : रोबोटने केली शस्त्रक्रिया; २५ वर्षीय तरुणाला जीवदान

मुंबई : उत्तर भारतातील वेंकटेश्‍वर हॉस्पिटलमध्ये ह्युगो रोबोटिक-असिस्‍टेड सर्जरी (आरएएस) सिस्टिमचा वापर करून यशस्‍वीरित्‍या करण्‍यात आली. अशाप्रकारे करण्यात आलेली ही पहिली युरोलॉजिकल शस्‍त्रक्रिया आहे.

वेंकटेश्‍वर हॉस्पिटलच्‍या युरोलॉजी व रेनल ट्रान्‍सप्‍लाण्‍ट विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. (मेजर जनरल) डी. व्ही. सिंग यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ पथकाने ही शस्‍त्रक्रिया पार पाडली. २५ वर्षीय रुग्णाच्‍या डाव्या बाजूला पीयूजे (पेल्विक यूरेटरिक जंक्शन) अडथळा होता आणि मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये बिघाड होण्‍यासोबत किडनीचा आकार वाढला होता.

रूग्‍णावर स्टेंटसह रोबोटिक-सहाय्यित लेप्रोस्कोपिक पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया (पायलोप्लास्टी) करण्यात आली, ज्यामुळे त्याच्या डाव्या मूत्रपिंडाचे कार्य यशस्वीरित्या पूर्ववत झाले आणि दोन दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्‍चार्ज देण्‍यात आला.

हेही वाचा: Elon musk : आता रोबोट करणार माणसाची कामे; टेस्लाच्या कारखान्यात प्रथम वापर

वेंकटेश्वर हॉस्पिटलने आशिया पॅसिफिक प्रदेशात ह्युगो आरएएस सिस्टिमसह पहिली सिस्टोप्रोस्टेक्टोमी देखील केली आहे. या शस्‍त्रक्रियेत मूत्राशय व प्रोस्टेट ग्रंथी आणि आसपासच्या लिम्फ नोड्स कमीत-कमी इन्‍वेसिव्‍ह प्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आले आणि रुग्णाला चार दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्‍चार्ज देण्‍यात आला.

पहिल्‍या शस्‍त्रक्रियेबाबत सांगताना वेंकटेश्‍वर हॉस्पिटल्‍सच्‍या सल्‍लागार समितीचे अध्‍यक्ष डॉ. वाय. पी. भाटिया म्‍हणाले, “या शस्‍त्रक्रिया रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेचे फायदे आणखी अनेक रुग्णांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही पुढाकार घेतला आहे.

ज्यांच्या आरोग्याच्या स्थितीसाठी विशेषत: युरोलॉजी, ग्‍यानेकोलॉजी आणि सामान्य शस्त्रक्रिया अशा शस्त्रक्रिया उपचार आवश्यक आहेत. मला विश्वास आहे की आम्ही आता आमच्या रूग्णांना अधिकाधिक उपलब्‍धता, स्थिरता आणि केअर प्रदान करण्याच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहोत.”

हेही वाचा: Diwali cleaning : या व्हॅक्यूम क्लिनरमुळे घराची स्वच्छता होईल सोपी

वेंकटेश्‍वर हॉस्पिटलच्‍या युरोलॉजी व रेनल ट्रान्‍सप्‍लाण्‍ट विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. (मेजर जनरल) डी. व्ही. सिंग म्‍हणाले, ‘’मेडट्रॉनिकमधील ह्युगो आरएएस सिस्टिम शस्‍त्रक्रियेमधील एक अत्याधुनिक व्‍यासपीठ आहे, जे अधिक स्थिरता आणि उच्च सुस्पष्टतेसह कमीत-कमी अॅक्‍सेसद्वारे जटिल शस्‍त्रक्रिया पार पाडण्यासाठी स्‍पेशालिट्सना सक्षम करेल.

वेंकटेश्वर हॉस्पिटलमध्ये आमच्या रूग्णांना, विशेषत: आव्हानात्मक सर्जिकल परिस्थितींमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना उच्च दर्जाचे सर्जिकल सोल्यूशन्स ऑफर करण्याचा आम्हाला सन्‍मान वाटतो.”

“भारतातील प्रत्येक रुग्ण दर्जेदार केअर आणि कमीत-कमी इन्‍वेसिव्‍ह शस्त्रक्रियेचे फायदे मिळण्यास पात्र आहे. ते शक्य करण्यासाठी रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रिया महत्वाची आहे. ह्युगो आरएएस सिस्टिमसारखे मेडट्रॉनिक तंत्रज्ञान हेल्थकेअरला नवीन रूप देत आहे. रुग्णांना गरजेच्‍या काळात मदत करण्यासाठी वेंकटेश्वर हॉस्पिटल्ससोबत भागिदारी करण्याचा आम्हाला आनंद होत आहे,” असे मेडट्रॉनिक इंडियाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मदन कृष्णन म्हणाले.

ह्युगो आरएएस सिस्टिम एक मॉड्यूलर, मल्टी-क्वाड्रंट व्‍यासपीठ आहे, जे सॉफ्ट-टिश्यू प्रक्रियेच्या विस्तृत श्रेणीसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. यात रिस्‍टेड इन्‍स्‍ट्रूमेंट्स, ३डी व्हिज्युअलायझेशन व टच सर्जरी एंटरप्राइझ, क्लाउड-आधारित सर्जिकल व्हिडिओ कॅप्चर व व्यवस्थापन सोल्यूशन, रोबोटिक्स प्रोग्राम ऑप्टिमायझेशन, सेवा व प्रशिक्षणात विशेष असलेल्या समर्पित सपोर्ट टीम्‍सचा समावेश आहे.

कमीत-कमी इन्‍वेसिव्‍ह शस्त्रक्रियेचे फायदे - कमी गुंतागूंत, लहान चट्टे, हॉस्पिटलमध्‍ये कमीत-कमी स्‍टे आणि सामान्य नित्‍यक्रमांकडे जलद परत येणे आणि जगभरातील अधिक रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्युगो आरएएस सिस्टिम आणि टच सर्जरी एंटरप्राइझ डिझाइन केले आहे.

टॅग्स :operationrobotics