Global Crash Test : भारतातील 'या' गाड्यांना ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये मिळाले अगदी खराब गुण; कित्येकांना मिळाला अवघा एक स्टार

Crash Test Rating : NCAP च्या मानकांनुसार सर्वात खराब क्रॅश टेस्ट रेटिंग मिळालेल्या गाड्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये मारुती सुझुकी, किया, ह्यूंडाई या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे.
NCPA Crash Test Rating
NCPA Crash Test RatingeSakal

Indian Cars Global NCAP Crash Test Ratings : आपल्या दारासमोर कार असावी हे कित्येकांचं स्वप्न असतं. आजकाल कित्येक स्वस्त कार उपलब्ध झाल्या आहेत. सोबतच बँकांनीही कार घेण्यासाठी विविध लोन ऑफर्स सुरू केल्या आहेत. अर्थात, केवळ स्वस्त मिळते म्हणून कोणतीही गाडी कोणी घेत नाहीत. गाडी खरेदी करताना त्याची सेफ्टी रेटिंग नक्कीच तपासणं गरजेचं आहे. यासाठी ग्लोबल न्यू कार असेस्मेंट प्रोग्रामची (NCAP) क्रॅश टेस्ट रेटिंग पाहिली जाते.

NCAP च्या मानकांनुसार सर्वात खराब क्रॅश टेस्ट रेटिंग मिळालेल्या गाड्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये मारुती सुझुकी, किया, ह्यूंडाई या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांना अडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये एक ते तीन स्टार रेटिंग मिळाले आहेत. (Unsafe cars in India, GNCAP test latest results)

मारुती सुझुकी

Maruti Suzuki Ignis या गाडीला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये अडल्ट सेफ्टीसाठी केवळ एक स्टार रेटिंग मिळाली आहे. तसंच, चाईल्ड सेफ्टीमध्ये या कारला 49 पैकी केवळ 3.86 पॉइंट्स मिळाले आहेत. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

NCPA Crash Test Rating
MWC Honor Magic 6 Pro : केवळ डोळ्यांनी कंट्रोल करता येणार कार; खास फीचर असणारा ऑनरचा स्मार्टफोन

एस-प्रेसो

Maruti Suzuki S-Presso या कारला देखील क्रॅश टेस्टमध्ये अडल्ट सेफ्टीसाठी केवळ एक स्टार रेटिंग मिळाली आहे. चाईल्ड सेफ्टीमध्ये या कारला 49 पैकी 3.52 पॉइंट्स मिळाले आहेत.

वॅगनार

मारुती सुझुकीची WagonR ही बऱ्यापैकी लोकप्रिय गाडी आहे. मात्र, या गाडीला अडल्ट सेफ्टीमध्ये 34 पैकी केवळ 9.69 पॉइंट्स मिळाले आहेत. तर चाईल्ड सेफ्टीमध्ये या कारला 49 पैकी 3.40 पॉइंट्स मिळाले आहेत. एकूणच लहान मुलांसाठी ही कार इग्निस आणि एस-प्रेसोपेक्षाही वाईट आहे.

स्विफ्ट

मारुतीची आणखी एक लोकप्रिय कार म्हणजे Swift. ग्लोबल NCAP ने दिलेल्या आकडेवारीनुसार, या गाडीला अडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये 34 पैकी 19.19 पॉइंट मिळाले आहेत. याला केवळ एक स्टार देण्यात आलाय. चाईल्ड सेफ्टीमध्ये या कारला 49 पैकी 16.68 पॉइंट्स देण्यात आले आहेत.

अल्टो K10

मारुतीच्या Alto K10 या कारला NCPA क्रॅश टेस्टमध्ये 2 स्टार रेटिंग मिळाली आहे. चाईल्ड सेफ्टीमध्ये या कारला 49 पैकी 3.52 पॉइंट्स मिळाले आहेत.

NCPA Crash Test Rating
EV Loan : डाऊन पेमेंटची चिंता सोडा, सरकारी बँक देतेय इलेक्ट्रिक गाडीसाठी 100% लोन; जाणून घ्या डीटेल्स

ह्युंडाई

Hyundai Grand i10 Nios या कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 2 स्टार रेटिंग मिळाली आहे. चाईल्ड सेफ्टीमध्ये या कारला 49 पैकी 15 पॉइंट्स मिळाले आहेत. तर ह्युंडाईच्या क्रेटा (Creta Safety Rating) या लोकप्रिय एसयूव्हीला अडल्ट सेफ्टीमध्ये 3 स्टार रेटिंग मिळाली आहे. चाईल्ड सेफ्टीमध्ये क्रेटाला 49 पैकी 28.29 पॉइंट्स मिळाले आहेत.

किया

Kia कंपनीच्या Seltos या गाडीचा परफॉर्मन्स देखील चांगला नव्हता. ग्लोबल NCAP ने आपल्या टेस्ट रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की सेल्टॉस गाडीचं बॉडी शेल हे अनस्टेबल आहे. या कारला अडल्ट सेफ्टीसाठी 3 स्टार रेटिंग मिळाली आहे. तर चाईल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 15 अंक मिळाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com