Domestic Violence : जागतिक तापमानवाढीमुळे भारतात वाढला घरगुती हिंसाचार; रिसर्चमध्ये धक्कादायक बाब उघड!

जामा सायकिएट्री या जर्नलमध्ये याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Domestic Violence
Domestic ViolenceeSakal
Updated on

जागतिक तापमानवाढीचा परिणाम आपल्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात होतो आहे. आता यामुळेच घरगुती हिंसाचारात वाढ होत असल्याचंही समोर आलं आहे. भारतासह इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये असं दिसून आलं आहे. जामा सायकिएट्री या जर्नलमध्ये याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दि गार्डियनने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, की भारत, पाकिस्तान आणि नेपाळमधील १५ ते ४९ वर्षांच्या १.९४ लाखांहून अधिक महिलांनी आपल्यासोबत भावनिक, शारीरिक आणि लैंगिक हिंसाचार झाल्याची माहिती दिली. १ ऑक्टोबर २०१० ते ३० एप्रिल २०१८ या कालावधीमधील हा डेटा आहे.

Domestic Violence
Sleep Divorce म्हणजे काय? ज्याच्या मदतीने जोडपी नातं सुधारण्याचा प्रयत्न करतात, याची गरज कुठे पडते? जाणून घ्या

इंटिमेट पार्टनरकडून अत्याचार

चीन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, टांझानिया आणि इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी संयुक्तपणे हा रिसर्च केला आहे. यात असं म्हटलं आहे, की जसं जसं पृथ्वीचं तापमान वाढत गेलं, तसं तसं महिलांवर इंटिमेट पार्टनरकडून होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये (IVP) वाढ होत गेली.

तापमानासोबत वाढणार हिंसा

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी तापमान जेव्हा १ डिग्री सेल्सिअल वाढलं, तेव्हा IVP चं प्रमाण ४.९ टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण शारीरिक अत्याचारांचं आहे. एकूण इंटिमेट पार्टनर व्हॉयलेंस पैकी शारीरिक अत्याचार २३ टक्के, भावनिक अत्याचार १२.५ टक्के आणि लैंगिक अत्याचार ९.५ टक्के नोंदवली गेली. सातत्याने होत असलेल्या तापमान वाढीमुळे IVP चं प्रमाण शतकाच्या शेवटीपर्यंत २१ टक्क्यांनी वाढण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.

Domestic Violence
Madras HC : गृहिणी घरात २४ तास करतात काम; पतीच्या अर्ध्या संपत्तीवर पत्नीचाही हक्क! हायकोर्टाचा निर्वाळा

भारताला सर्वाधिक धोका

या रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे, की भारतात २०९० सालापर्यंत IVP चं प्रमाण २३.५ टक्के एवढं होईल. यानंतर नेपाळचा (१४.८ टक्के) क्रमांक असेल. तर पाकिस्तानमध्ये हे प्रमाण केवळ ५.९ टक्के असेल असंही यात म्हटलं आहे.

Domestic Violence
Divorce Case : अखेर नोकरी नसलेल्या पतीला पोटगी देण्यास पत्नी तयार! घटस्फोटाचा दावा निकाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com