Gmail चे नवीन अपडेट अखेर लाईव्ह; काय झालेत नवीन बदल? वाचा डिटेल्स

 gmail new view update live now how to get the latest gmail updates check what has changed
gmail new view update live now how to get the latest gmail updates check what has changed

लेटेस्ट Gmail अपडेट लाईव्ह झाले झाले असून ज्यामध्ये जीमेल संपुर्ण नवीन लूक मिळाला आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना Gmail वापरताना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. या नवीन अपडेटमुळे Gmail इनबॉक्समध्येही मोठा बदल होणार आहे. गुगलने अखेर हे अपडेट लाईव्ह केले आहे. दरम्यान अनेक युजर्सना आधीच हे अपडेट मिळाले आहे. हे बदल Google Chat आणि Google Meet सह अनेक Google प्रॉपर्टीवर झाले आहेत. तुम्ही अद्याप हे बदल अनुभवले नसतील तर, त्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या..

पहिल्यांदा तुम्हाला 'Try the new Gmail view' हा Gmail नोटिफिकेशन एक्सेप्ट करावे लागेल. तुम्ही ते केल्यानंतर तुमचे Gmail लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट होईल.

लेटेस्ट Gmail अपडेट कसे मिळेल?

- तुम्ही 'Try the new Gmail view' नोटिफीकेशन एक्सेप्ट केल्यानंतर, तुमच्या अकाऊंटवर Gmail रीडिझाइन लागू केले जाईल आणि ते तुम्हाला पेज रीलोड करण्यास सांगितले जाईल. एकदा तुम्ही असे केल्यावर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर Gmail च्या नवीन व्हिज्युअल फंक्शनॅलिटीचा पुर्ण एक्सेस दिला जाईल.

- ते अद्याप काम करत नसेल तर त्यामुळे Gmail सेटिंग्जवर जा आणि वरच्या उजव्या कोपर्‍यात गीअर आयकॉनवर टॅप करा आणि "Return to the original Gmail view" वर क्लिक करा. आता, क्विक सेटिंग्ज वर जा आणि "Try the new Gmail view" निवडा.

 gmail new view update live now how to get the latest gmail updates check what has changed
Russia Ukraine War Live : रशियाकडून युद्धविराम जाहीर, लोकांना बाहेर काढण्याचा निर्णय

Gmail New View मध्ये नवीन काय आहे?

- Gmail नवीन लूकमध्ये अपडेट केल्यामुळे, फोल्डर्स आणि लेबल्ससाठी मागील साइडबार उजवीकडे हलविला जाईल. Googut चॅट, स्पेस आणि मीट एक्सेस करण्यासाठी इंटिग्रेटेड आणि युनिफाइड पर्याय असतील. तुम्हाला हे एक्सेस फक्त एका क्लिकवर मिळणार आहेत.

- नेहमीच्या Gmail डिझाइनमध्ये एकतर्फी पॅनेल आहे जे Gmail, चॅट, स्पेस आणि मीट एकाच कॉलममध्ये एकत्र आणते ज्यामध्ये स्क्रोल करून एक्सेस केले जाऊ शकते. परंतु नवीन डिझाइनमध्ये पॅनेल लपवले जाऊ शकते जे अॅप चिन्हावर होवरींग करुन सहजपणे एक्सेस करू शकता. याव्यतिरिक्त, डाव्या पॅनेलच्या तळाशी दिसणारे चॅट हेड पूर्ण-स्क्रीन मोडमध्ये उघडतील.

 gmail new view update live now how to get the latest gmail updates check what has changed
500 पेक्षा कमीत Jio, Airtel अन् Vi चे डेली 2GB डेटासह बेस्ट प्लॅन

बदल आवडला नाही तर

जर तुम्हाला हे बदल आवडले नसतील, तर तुम्ही ते सहजपणे क्लासिकमध्ये रूपांतरित करू शकता. फक्त सेटिंग्ज वर जा आणि नंतर "क्विक सेटिंग्ज" मध्ये 'Return to original Gmail view' वर टॅप करा. आता, ते तुम्हाला पेज रीलोड करण्यासाठी सूचना करेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडत्या Gmail View वर परत याल.

 gmail new view update live now how to get the latest gmail updates check what has changed
रशियन टीव्ही कर्मचाऱ्यांचा लाईव्ह शोमध्ये राजीनामा, म्हणाले “नो टू वॉर”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com