भारीच! Gmail वर ऑटोमॅटिक डिलीट होतील नको असलेले ईमेल; जाणून घ्या प्रोसेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gmail trick know how to auto-delete unrequired emails from email inbox see the process

भारीच! Gmail वर ऑटोमॅटिक डिलीट होतील नको असलेले ईमेल; पाहा प्रोसेस

आपल्यापैकी बरेच जण Gmail वापरता, दरमयान यामध्ये वापरकर्त्यांना 15 GB स्टोरेज देण्यात आलेले असते. पण काही वेळा अनावश्यक मेल्समुळे जीमेलची 15 जीबी स्पेस भरून जाते आणि त्यामुळे जीमेलवरील मेल बाऊन्स होऊ लागतात. म्हणजेच तुम्हाला जीमेलवर कोणतेही ईमेल येणे बंद होते.

ही समस्या दोन प्रकारे सोडवता येते . एक उपाय म्हणजे अतिरिक्त स्पेस खरेदी करणे. ज्यासाठी तुम्हाला महिन्याला सुमारे 150 रुपये मोजावे लागतील. दुसरे म्हणजे अनावश्यक मेल एक एक करून डिलीट करणे. पण यामध्ये तुमचा बराच वेळ वाया जाईल. म्हणूनच आज आपण अनावश्यक ईमेल ऑटोमॅटिक डिलीट करण्याच्या ट्रिक जाणून घेणार आहोत-

हेही वाचा: 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले स्मार्टफोन, किंमत 20 हजारांहून कमी

ऑटो डिलीशनसाठी फिल्टर (Filter for Auto Deletion)

Gmail द्वारे त्याच्या वापरकर्त्यांसाठी एक फीचर उपलब्ध करून दिले आहे. ज्याचे नाव आहे 'फिल्टर्स फॉर ऑटो-डिलीशन', जे अनावश्यक ईमेल आपोआप डिलीट करण्यात मदत करते. चला त्याच्या वापराबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

  • सर्वप्रथम तुमच्या वैयक्तिक कंप्युटर किंवा लॅपटॉपवर Gmail उघडा.

  • त्यानंतर सर्च बार ऑप्शनवर जा . येथे तुम्हाला राइट साइज फिल्टर आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करा.

  • आता तेथे एक बॉक्स उघडेल, तिथे तुम्हाला ज्या सर्व्हिसचे मेसेज डिलीट करायचे असतील त्याचे फिल्टर तयार करावे लागेल.

  • येथे तुम्हाला आर्काइव्हसह अनेक प्रकारचे मेसेज डिलीट करण्याचा ऑप्शन मिळेल, वापरकर्त्यांना त्यांच्यानुसार पर्याय निवडावा लागेल आणि Create Filter पर्यायावर क्लिक करावे लागेल. आणि नंतर 'Delete it' हा ऑप्शन निवडावा लागेल.

टीप - जर तुम्हाला चिन्ह दिसत नसेल, तर तुम्हाला ते सेटिंग्ज सेक्शनमध्ये 'Filters and blocked addresses' टॅबमध्ये देखील सापडेल त्यानंतर, तुम्हाला फक्त 'Create a new filter' बटणावर टॅप करावे लागेल.

हेही वाचा: Oppo, Xiaomi कंपन्या अडचणीत; लागू शकतो तब्बल 1,000 कोटींचा दंड

Web Title: Gmail Trick Know How To Auto Delete Unrequired Emails From Email Inbox See The Process

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Google
go to top