Oppo, Xiaomi कंपन्या अडचणीत; लागू शकतो तब्बल 1,000 कोटींचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Xiaomi Oppo violated Indian tax law

Oppo, Xiaomi कंपन्या अडचणीत; लागू शकतो तब्बल 1,000 कोटींचा दंड

भारतीय आयकर विभाग (Income Tax Department) चीनी तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दिग्गज स्मार्टफोन निर्माता कंपन्या Xiaomi आणि Oppo यांना तब्बल 1,000 कोटी रुपयांचा दंड ठोठावू शकते. 21 डिसेंबर रोजी आयकर विभागाने (Income Tax Department) दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगालसह 11 राज्यांमधील या कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. (Xiaomi Oppo violated Indian tax law)

दरम्यान आता आयकर विभागाने एका निवेदनाद्वारे माहिती दिली आहे की, नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये या दोन बड्या कंपन्यांनी परदेशात असलेल्या त्यांच्या समूहाच्या कंपन्यांमध्ये रॉयल्टी स्वरुपात एकूण 5,500 रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार दाखविल्याचे आढळून आले आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, आयकर विभागाने सागितले की, या कंपन्यांनी (Xiaomi, Oppo) या व्यवहारा दरम्यान आयकर कायदा, 1961 अंतर्गत देण्यात आलेल्या नियामांचे पालन केले नाही. या चुकीमुळे आयकर कायदा 1961 (A) अंतर्गत त्याच्यावर करवाई होऊ शकते ज्यामध्ये या कंपन्यांवर तब्बल 1,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, दोनपैकी एका कंपनीने संबंधित उद्योगांकडून पेंमेंट करुन आपला खर्च वाढवला, ज्यामुळे कंपनीचा करपात्र नफा (Taxable Profit) कमी झाला. यामध्ये 1,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम असू शकते.

हेही वाचा: कोरोनाचा फटका, डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर ४ महिन्यांच्या उच्चांकावर

याशिवाय, 5,000 कोटींहून अधिक रुपयांच्या खोटी उधारी दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी विभाग दोन्ही कंपन्यांची चौकशी करत आहे. दोन कंपन्यांपैकी एकाने भारतातील दुसर्‍या युनिटची सर्व्हिस वापरली, मात्र स्त्रोतावरील कर भरण्यासंबंधीच्या तरतुदींचे पालन केले नाही, ज्यामुळे त्यांना 300 कोटी रुपये ($40 मिलीयन) कर (TDS) ला चुकवल्याप्रकरणी जबाबदार धरण्यात आले आहे.

सध्या, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु आयकर विभागाच्या या विधानामुळे अशी शक्यता आहे की Xiaomi आणि Oppo यांना भविष्यात कायदेशीर कारवाई किंवा शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.

हेही वाचा: Vi चे युजर्सना न्यू इयर गिफ्ट, रिचार्ज प्लॅन्सवर मिळतील भन्नाट ऑफर्स

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crime
loading image
go to top