esakal | भारतात जी-मेलचा प्रॉब्लेम; यूजर्सच्या प्रचंड तक्रारी
sakal

बोलून बातमी शोधा

gmail upload drive issues Indian users

गुगलने आपल्या स्टेटस पेजमध्ये या समस्येची कबुली दिली आहे. याबद्दल गुगलने आपल्या स्टेटस पेजवर "आम्ही जीमेलमध्ये येत असलेल्या समस्येची चौकशी करीत आहोत याबद्दल आम्ही लवकरच अधिक माहिती देऊ. असं लिहलं आहे.

भारतात जी-मेलचा प्रॉब्लेम; यूजर्सच्या प्रचंड तक्रारी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सध्या भारतातील अनेक जीमेल (gmail) यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये जीमेल करताना 'अटॅचमेंट्स' (attachments) आणि 'लॉग इन'सह (log in) इतर अडचणी येत असल्याची तक्रार आहे. या समस्या सारख्या येत असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. बऱ्याच यूजर्सनी जीमेलमध्ये अटॅचमेंट्स जोडण्यासाठी आणि गुगल ड्रायव्हवर (google drive) फाईल अपलोड करताना अडचणी येत असल्याचं सांगितलंय.

टेक्नॉलॉजीशी संबंधित इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

जीमेल आणि गुगल ड्रायव्ह या दोन्ही सेवा गुगलच्या (Google) मालकीच्या आहेत.  
डाऊन डिटेक्टरच्या (Down Detector) म्हणण्यानुसार, जी-मेल आणि गुगल ड्राईव्हबद्दलच्या अडचणी फक्त भारतातच येत नसून त्या भारत सोडून जगातील इतर काही देशांतही निर्माण झाल्या आहेत. या अडचणी भारता व्यतिरिक्त जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इतरही अनेक देशांमध्येही येत आहेत. बरेच यूजर्स गुगल ड्रायव्हवर  फाइल्स डाउनलोड किंवा अपलोड करू शकत नाहीयेत.

आणखी वाचा - आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं घसरलं!

गुगलने आपल्या स्टेटस पेजमध्ये या समस्येची कबुली दिली आहे. याबद्दल गुगलने आपल्या स्टेटस पेजवर "आम्ही जीमेलमध्ये येत असलेल्या समस्येची चौकशी करीत आहोत याबद्दल आम्ही लवकरच अधिक माहिती देऊ. असं लिहलं आहे. कोरोनाकाळात येणाऱ्या या अडचणी गुगल कंपनीसाठी भविष्यात नुकसानकारक ठरू शकतील, असं तज्ञांच मत आहे. काही यूजर्सनी सांगितले की, त्यांना ई-मेल पाठविण्यात खूप अडचणी येत असून , तर काहींनी फाइल अटॅच करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती प्रक्रिया खूप हळू होत असल्याचे दर्शवित आहे. प्रत्येक वेळेस "आपल्याला आपले नेटवर्क तपासणे आवश्यक आहे" (you need to check your network) असा संदेश येत आहे.

loading image
go to top