EV Conversion Kit : तुमची पेट्रोलवर धावणारी दुचाकी होणार इलेक्ट्रिक! GoGoA1 कंपनीने लाँच केलं खास किट; आरटीओने दिली परवानगी

Electric Vehicle : यामुळे तुम्ही आता कायदेशीररित्या आपली पेट्रोलची दुचाकी इलेक्ट्रिक बनवू शकता.
EV Conversion Kit
EV Conversion KiteSakal
Updated on

इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्यावरणाला आणि आपल्यालाही भरपूर फायदा असतो. मात्र या गाड्यांच्या किंमती जास्त असल्यामुळे कित्येक लोक इच्छा असूनही ती घेऊ शकत नाहीत. मात्र आता तुमच्या दुचाकीलाच इलेक्ट्रिक बाईकमध्ये कन्व्हर्ट करता येणं शक्य होणार आहे.

GoGoA1 कंपनीने यासाठी एक खास प्रकारचं ईलेक्ट्रिक वाहन कन्व्हर्जन किट लाँच केलं आहे. हे किट अगदी स्वस्त असून, याला आरटीओने देखील हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे तुम्ही आता कायदेशीररित्या आपली पेट्रोलची दुचाकी इलेक्ट्रिक बनवू शकता.

EV Conversion Kit
Virtus Electric Cycle : गिअर सायकलच्या किंमतीत मिळतेय दमदार इलेक्ट्रिक सायकल; 'टाटा'ला देणार टक्कर!

50 मॉडेल्सना सपोर्ट

सध्या हे किट 50 हून अधिक दुचाकींना सपोर्ट करत असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. यामध्ये हीरो, हीरो-होंडा आणि होंडाच्या गाड्यांचा तसेच स्कूटरचा समावेश आहे. अ‍ॅक्टिव्हा स्कूटरच्या पाच व्हेरियंटचा देखील यात समावेश आहे. (EV Conversion Kit)

किती असणार किंमत?

कंपनीने अद्याप या किटची एकत्रित किंमत आणि फीचर्स याबाबत जास्त माहिती उपलब्ध केली नाही. मात्र, कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरुन साधारण अंदाज मिळू शकतो.

होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरच्या कन्व्हर्जन किटची किंमत 19 हजार रुपये आहे. याशिवाय 1.6 kWh LFP बॅटरीसाठी अतिरिक्त किंमत 30 हजार रुपये आहे. ही बॅटरी 60 किलोमीटरची रेंज देते. तर बॅटरीच्या इनबिल्ट IoT साठी 5 हजार रुपये आणि चार्जरसाठी 6,500 रुपये मोजावे लागणार आहेत.

EV Conversion Kit
Best Mileage Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय? 'या' आहेत बेस्ट मायलेज देणाऱ्या टॉप ई-स्कूटर!

एका बाईकच्या (गिअरची दुचाकी) कन्व्हर्जन किटची किंमत 29,999 रुपये आहे. बॅटरी आणि IoT साठी स्कूटरप्रमाणेच किंमत असणार आहे. इन्स्टॉलेशन आणि आरटीओ डॉक्युमेंटेशन यासाठी अतिरिक्त 5 हजार रुपयांचा खर्च असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com