
संशोधकांनी असा बॅक्टेरिया शोधला जो मातीमधून २४ कॅरेट शुद्ध सोनं तयार करतो.
ही प्रक्रिया पारंपरिक सोनं उत्खननापेक्षा स्वस्त, शाश्वत आणि पर्यावरणस्नेही आहे.
या तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि खाणीतील उरलेल्या मातीचा पुनर्वापर होऊ शकतो.
जगभरात सोन्या-चांदीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. सामान्यांसाठी सोनं हळूहळू परवडण्याच्या बाहेर जात आहे. येत्या काही वर्षांत सोन्याचे दागिने घेणे अनेकांसाठी स्वप्नवत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत एका वैज्ञानिक शोधाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संशोधकांनी असा एक चमत्कारिक बॅक्टेरिया शोधून काढला आहे जो विषारी माती खाऊन त्यातून २४ कॅरेट शुद्ध सोनं बाहेर टाकतो
या अद्भुत बॅक्टेरियाचे नाव आहे कप्रीएविडस मेटालिड्यूरन्स (Cupriavidus metallidurans). याला विषारी आणि धातूंनी भरलेली माती अतिशय प्रिय असते. ही माती खाल्ल्यानंतर तो त्यावर रासायनिक प्रक्रिया करतो आणि तिच्यातील धातूंना सोन्याच्या कणांमध्ये रूपांतरित करतो. नंतर हे सोन्याचे शुद्ध कण तो आपल्या विष्ठेतून बाहेर टाकतो. थोडक्यात, हा बॅक्टेरिया जणू ‘सोनं खणणारा जीवाणू’ बनला आहे.
सध्या जगभरात सोनं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जाते. या प्रक्रियेमुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. पण या बॅक्टेरियामुळे हे चित्र बदलू शकते. कमी खर्चात, कमी प्रदूषणात आणि अधिक शुद्धतेने सोनं मिळण्याची शक्यता आता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.
या बॅक्टेरियाचा उपयोग फक्त खाणीपुरता मर्यादित राहणार नाही. जुने इलेक्ट्रॉनिक वेस्ट, खाणीत उरलेली माती आणि इतर टाकाऊ धातूंमधूनही या बॅक्टेरियाच्या मदतीने सोनं वेगळं करता येऊ शकणार आहे. त्यामुळे हा शोध फक्त वैज्ञानिक क्षेत्रासाठीच नव्हे तर पर्यावरण, उद्योग आणि अर्थव्यवस्थेसाठीही एक क्रांतिकारक बदल ठरू शकतो.
या शोधामुळे वैज्ञानिकांनी जणू सोन्याची लॉटरीच जिंकली आहे, असे म्हटले जात आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी गुंतवणुकीत अधिक सोनं मिळवणं शक्य होईल. आणि पर्यावरणालाही धक्का न लावता
या शोधामुळे खाण उद्योगात क्रांती येण्याची चिन्हं आहेत. जगातील मौल्यवान धातूंमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सध्या तरी हे संशोधन प्रयोगशाळेपुरते मर्यादित आहे, पण येत्या काळात या बॅक्टेरियाच्या वापराला औद्योगिक स्तरावर मान्यता मिळाली, तर सोनं निर्माण करण्याची ही ‘जैविक क्रिया’ संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेईल, यात शंका नाही.
What is the name of the gold-producing bacteria?
या बॅक्टेरियाचे नाव "कप्रीएविडस मेटालिड्यूरन्स" आहे.
How does the bacteria produce gold?
हा बॅक्टेरिया विषारी मातीतील धातूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्यांना सोन्याच्या कणांमध्ये रूपांतरित करतो.
Can this bacteria be used in gold mining?
होय, या बॅक्टेरियामुळे पारंपरिक सोनं उत्खनन पद्धतीला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
Is the process environmentally friendly?
हो, ही पद्धत कमी प्रदूषण आणि पर्यावरणस्नेही आहे.
Can electronic waste also be used in this method?
होय, इलेक्ट्रॉनिक वेस्टमधूनही या बॅक्टेरियाच्या मदतीने सोनं वेगळं करता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.