Instagram यूजर्ससाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार आहेत हे 7 नवीन फीचर्स

Good news for Instagram users these 7 new features are coming soon
Good news for Instagram users these 7 new features are coming soon
Summary

तुम्हीही इंस्टाग्राम यूजर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. कारण इंस्टाग्रामवर 7 नवीन फीचर्स आले आहेत. Instagram मेसेजिंगच्या नवीन फिचर्सबाबत जाणून घेऊ या..

Instagram फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर मेसेजिंगचा अनुभव अधिक मजेदार आणि सुलभ करण्यासाठी Instagram सात नवीन फिचर्स आणण्याची तयारी करत आहे. Instagram ची नवीन फिचर्स लवकरच निवडक देशांमध्ये उपलब्ध होतील, कंपनी आता जागतिक प्रेक्षकांपर्यंत आपली पोहोच वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. इंस्टाग्राम आता फोटो शेअरिंग तसेच रील बनवण्यासाठी जगभरात लोकप्रिय आहे. निर्माते असोत किंवा सेलिब्रिटी असोत, प्रत्येकजण आजकाल रील बनवतो आणि नवीन ट्रेंड फॉलो करून व्हायरल देखील होतो.

त्यामुळे तुम्ही जर इंस्टाग्राम यूजर्स आहात तर तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. कारण इंस्टाग्रामवर ७ नवीन फीचर्स येणार आहे. Instagram मेसेजिंगच्या नवीन फिचर्सबाबत जाणून घेऊ या..

Good news for Instagram users these 7 new features are coming soon
मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्युमरमध्ये कोणताही संबध नाही; ऑक्सफोर्डचे संशोधन

1.सात फिचर्सपैकी पहिले फिचर युजर्सला इनबॉक्समध्ये न जाता थेट चॅटला उत्तर देण्याची परवानगी देईल. यात एक नवीन क्विक सेंड फिचर देखील आहे जे युजर्सला शेअर बटणवर टॅप करून आणि होल्ड करून त्यांच्या जवळच्या मित्रांसह पोस्ट सहजपणे रीशेअर करण्यास अनुमती देईल.

2. यूजर्स इनबॉक्सच्या टॉपवर ते मित्र दर्शविले की जे ऑनलाईन चॅट करण्यासाठी उपलब्ध आहेत.

3. यूजर्स आता कोणत्याही गाण्याबाबत ३० सेकंदचा प्रिव्ह्यू शेअर करण्यासाठी सक्षम आहेत, ज्यामध्ये मित्र ते चॅट विंडोमार्फत ऐकू शकतात.

Good news for Instagram users these 7 new features are coming soon
IBPS Recruitment 2022: आयबीपीएसच्या विभाग प्रमुख पदासाठी भरती, मिळणार 25 लाख पगार

4. या प्रिव्ह्यूला अधिक सक्षम करण्यासाठी Instagram ने Apple Music, Amazon Music आणि Spotify सोबत काम करणार आहे.

5. चॅट पसर्नलाईज करण्यासाठी एक लो -फाय चॅट थीम देखील सुरू करणार आहे.

6. इंस्टाग्राम यूजर्ससोबत मेसेजमध्ये @silent अॅड करून कोणत्याही फ्रेन्डला नोटिफिकेशन न पाठवता मेसज पाठवू शकता.

7. अखेर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूजर्सला इंस्टाग्रामवर ग्रुप चॅटमध्ये Polचा देखील पर्याय देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com