VI ग्राहकांसाठी चांगली बातमी; अ‍ॅपमध्ये मिळणार 1200+ Android गेम

 VI customers 1200+
VI customers 1200+
Summary

Vi Games नावाने सुरू होणाऱ्या या गेमिंग सर्विसअंतर्गत 1200 पेक्षा जास्त Android आणि HTML5 आधारित मोबाईल गेम उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये मोफत आणि सशुल्क (Free and Paid) दोन्ही प्रकारचे मोबाईल गेम उपलब्ध असणार आहे.

Vi Games नावाने सुरू होणाऱ्या या गेमिंग सर्विसअंतर्गत 1200 पेक्षा जास्त Android आणि HTML5 आधारित मोबाईल गेम उपबब्ध होणार आहे. त्यामध्ये मोफत आणि सशुल्क (Free and Paid) दोन्ही प्रकारचे मोबाईल गेम उपलब्ध असणार आहे.

टेलीकॉम ऑपरेटर व्होडाफोन आयडिया लिमिडेटने सोमवारी भारतामध्ये गेमिंगसंबधित उत्साही लोकांसाठी वैयक्तिक गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया कंपनीने नझारा टेक्नोलॉजी लिमिटेड सोबत भागीदारीत Vi app वर ‘Vi Game’ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गच व्होडाफोन आयडिया आपल्या सब्सक्राईबरसाठी गेमिंग सेवा सुरू करणार आहे. Vi Games नावाने सुरू होणाऱ्या या गेमिंग सर्विसअंतर्गते1200 पेक्षा जास्त Android आणि HTML5 आधारित मोबाईल गेम उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये मोफत आणि सशुल्क (Free and Paid) दोन्ही प्रकारचे मोबाईल गेम उपलब्ध असणार आहे.

कंपनीने सांगितले की, त्याबाबत गेम ऑफरिंगची सुरूवात कॅज्यूअल गेमने होईल. हळू हळू त्याचा विस्तार होईल आणि पुन्हा त्यामध्ये गेम आणि ई-स्पोर्ट्स गेम समाविष्ट आहे. याबाबत झालेल्या प्रक्रियेसंदर्भात ब्रीफिंगमध्ये व्होडाफोन आयडियाचे चीप मार्केटिंग ऑफिस अवनीश खोसला ( Avneesh Khosla) यांनी सांगितले की, या सेवा सुरूवात VI प्रीपेड आणि पोस्टपेड सब्सक्राईबरसाठी होईल. यानंतर या सेवा दुसऱ्या सबस्काईबरसाठी उपलब्ध केला जाईल. पण याबाबत त्यांनी माहिती दिली नाही.

ही आहे किंमत

या सेवा Vi फ्लॅगशिप अॅपद्वारे वेग-वेगळ्या प्लॅनअंतर्गत मिळणार आहे. प्लॅन आहे की Gold pass आणि Platinum Pass. गोल्ड पास पोस्टपेडसाठी 50 रुपये मासिक फी आणि प्रीपेडसाठी 56रुपये मासिक फी आकारले जाईल, आणि त्यानंतर 30 प्रीमियम गेम मिळणार आहेत

याच प्रमाणे पोस्टपेड यूजरला 499 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचे प्लॅन देणार आहे. त्यांनी दर महिन्याला 5 फ्री गोल्ड गेम मिळणार आहे.

प्लॅटिनम पास प्लॅन प्रत्येक डाऊलोड साठी शुक्ल आकरले जाईल, ज्याअंतर्गत सब्सक्राईबर कोणतेही एक एक्स्लूसिव आणि सुपर प्रीमियम गेम रु. 25 रुपये (पोस्ट पेड) / 26 रुपये (prepaid) मध्ये डाऊनलोड करू शकतात.

Vi ने असेही सांगितले आहे की ते, ''त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 250 हून अधिक जाहिरात-समर्थित विनामूल्य गेम ऑफर करेल. ही घोषणा अशा वेळी आली आहे. जेव्हा भारतात मोबाईल गेमिंग व्यवसायात झपाट्याने वाढ होत असताना कोरोना महामारीमुळे लोक घरात बंदिस्त आहेत.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com