esakal | आता Google वर शिकता येणार परकीय भाषा?
sakal

बोलून बातमी शोधा

google office

आता Google वर शिकता येणार परकीय भाषा?

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: सध्या आपल्याला कोणत्याही गोष्टीची, ठिकाणीची किंवा कोणतीही माहिती हवी असेल तर पहिल्यांदा ती माहिती गुगलवर शोधतो. या काळात गुगल हे सर्वांसाठी महत्त्वाचे झाले आहे. तसेच गुगल जगात विविध क्षेत्रात कार्य करताना दिसत आहे. मागील महिन्याच्या कंपनीच्या मिटींगमध्ये एआय मॉडेलचे परीक्षण (AI model- artificial intelligence) केले होते. याचा उपयोग आता कंपनी विविध भाषांच्या मुक्त संवादामध्ये उपयोगाला आणण्याच्या बेतात आहे. आता गुगल कंपनी ते तंत्रज्ञान परकीय भाषा शिकवण्याच्या अभ्यासक्रमांमध्ये (foreign language teaching courses) वापरण्यासाठी योजना आखत असल्याचे रिपोर्टमधुन पुढे आले आहे.

या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर टेक्स्टसाठी (text) केला जाणार आहे नंतर ते व्हाईस असिस्टंट (voice assistant) आणि युट्यूबमध्येही वापरले जाऊ शकते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सध्या या क्षेत्रात Duolingo, Rosetta Stone आणि Babel यांचा दबदबा आहे. आता परदेशी भाषा शिकवण्याच्या व्यवसायात गूगलही लवकरच दिसणार आहे.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये Dating app चा वापर वाढला, व्हिडीओ कॉलही वाढले

परदेशी भाषा शिकवण्यासाठी गुगल कंपनीने यापुर्वीही अनेक पावले उचलली आहेत. यापुर्वी गुगल Read Along ऍपद्वारे तसेच भारतीयांसाठी खास Bolo ऍप तयार केले होते. BGR च्या मते, गुगलच्या नव्या प्रकल्पाचा उद्देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मानवांमधील संभाषण अधिक नैसर्गिक व्हावे हा आहे. यासाठी अनेक तंत्रज्ञ कित्येक वर्षांपासून काम करत आहेत.

MySmartPrice च्या मते, हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर Google सेवांसह जोडलेली टिव्होली (Tivoli) कोणत्याही विदेशी भाषा शिकणार्‍या संस्थेपेक्षा किंवा ऍपपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल.

loading image