चॅम्पियन्स ट्रॉफीनिमित्त गुगलचा डुडलद्वारे खास गेम

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

लोकप्रिय सर्चइंजिन "गुगल'ने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्‍वभूमीवर खास डुडल आणि गेम तयार केला आहे. गुगलने विशेष डुडल तयार केले असून पारंपारिक पद्धतीने डुडलवर क्‍लिक केल्यानंतर लेख, माहिती किंवा चित्रे दिसण्याऐवजी क्रिकेटचा एक अनोखा गेम खेळण्याची संधी गुगलने युजर्सना उपलब्ध करून दिली आहे.

नवी दिल्ली : लोकप्रिय सर्चइंजिन "गुगल'ने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्‍वभूमीवर खास डुडल आणि गेम तयार केला आहे. गुगलने विशेष डुडल तयार केले असून पारंपारिक पद्धतीने डुडलवर क्‍लिक केल्यानंतर लेख, माहिती किंवा चित्रे दिसण्याऐवजी क्रिकेटचा एक अनोखा गेम खेळण्याची संधी गुगलने युजर्सना उपलब्ध करून दिली आहे.

चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफीमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या देशांच्या टीमचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर गुगलने डुडल तयार केले आहे. भारतासह जगभरातील एकूण नऊ देशांच्या गुगलच्या होमपेजवर हे डुडल दिसत आहे. या डुडलवर क्‍लिक केल्यानंतर आकर्षक, साधा आणि सोपा गेम सुरू होतो. विशेष म्हणजे गेममध्ये दिसणारे सर्व खेळाडू म्हणजे गोगलगायी आहेत. त्यामुळे हा गेम अधिक आकर्षक वाटत आहे. हा खेळ कमी वेगाच्या नेटवर्कवरही सहज खेळता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आल्याचे "गुगल'ने म्हटले आहे. युजरचा सहभाग असलेले हे आतापर्यंतचे सर्वांत कमी आकाराचे डुडल असल्याचेही गुगलने सांगितले आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
जनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय​
प्रशासकीय नव्हे; परराष्ट्र सेवेत जाणार​
करिअरसाठी स्काय इज द लिमिट​
मराठवाड्यात दीडशे दिवसांत 361 शेतकरी आत्महत्या​
मंत्री झालो याची शेट्टींना असुया..! - सदाभाऊ खोत​
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

'आयटी'तील तरुणीची गोळ्या घालून हत्या; प्रियकरानेच हत्या केल्याचा संशय
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: google doodle champions trohphy cricket india-pak match india news new delhi sports