Women's Day Doodle : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुगलने दिल्या खास शुभेच्छा; आजचं डूडल पाहिलंत का?

International Women's Day : 1975 साली संयुक्त राष्ट्रांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला होता. यावर्षीची महिला दिनाची थीम 'इनव्हेस्ट इन वुमेन : अ‍ॅक्सेलेरेट प्रोग्रेस' अशी आहे.
Women's Day Doodle 2024
Women's Day Doodle 2024eSakal

Google Doodle Today : 8 मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून साजरा केला जातो. महिलांचे हक्क आणि जेंडर इक्वालिटीबाबत जागरुकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने गुगलनेही आपल्या खास शैलीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलच्या होम पेजवर आज नेहमीच्या 'Google' या अक्षरांऐवजी एक डूडल दिसेल.

गुगलचं आजचं डूडल हे सोफी डियाओ (Sophie Diao) या डूडल आर्टिस्टने बनवलं आहे. या डूडलमध्ये एक आजी तिच्या मुलीला आणि नातीला गोष्ट सांगताना दिसत आहे. या तिघी एका गोधडीत बसलेल्या दाखवल्या आहेत. या गोधडीवर गेल्या काही वर्षात आपण केलेल्या प्रगतीची चिन्हं दाखवली आहेत. सोफी सांगतात, की त्यांच्या आजीकडे असणारं कम्फर्टेबल आणि कोझी वातावरण त्यांना यामधून दाखवायचं होतं. (Google Doodle on Women's Day)

जुन्या पिढीकडून त्यांचं ज्ञान, अनुभव या गोष्टी पुढच्या पिढीकडे जाताना या डूडलमध्ये दाखवल्या आहेत. सोबतच घरातील सर्व पिढ्या एकमेकांसोबत वेळ व्यतीत करताना यात दाखवलं आहे. "लोकांनी वेगवेगळ्या पिढीच्या लोकांसोबत भरपूर वेळ व्यतीत करायला हवा. जुन्या पिढीतील लोकांच्या अनुभवातून आपण खूप काही शिकू शकतो. माझ्या या डूडलमुळे लोकांना याबाबत प्रेरणा मिळेल अशी आशा आहे." असंही सोफी म्हणाल्या. (Women's Day Google Doodle)

Women's Day Doodle 2024
Women's Day 2024 : जांभळा, पांढरा आणि हिरवा ‘या’ तीन रंगांचे महिला दिनाशी काय आहे कनेक्शन? जाणून घ्या याचे महत्व

महिला दिन

1975 साली संयुक्त राष्ट्रांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला होता. यावर्षीची महिला दिनाची थीम 'इनव्हेस्ट इन वुमेन : अ‍ॅक्सेलेरेट प्रोग्रेस' अशी आहे. तर यावर्षीची कॅम्पेन थीम 'इन्स्पायर इन्क्लुजन' (Inspire Inclusion) अशी आहे. समाजातील महिलांच्या महत्त्वाबाबत, हक्काबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे; आणि अशा समाजाच्या निर्मितीला प्रोस्ताहन देणे, जिथे महिलांना जोडलेलं आणि सशक्त वाटेल - हे या थीमचं उद्दिष्ट आहे. (Women's Day 2024 Theme)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com