Google Flights Feature : सुट्ट्यांमध्ये थेट विमानाने जा घरी; स्वस्त तिकीट शोधण्यासाठी 'गुगल फ्लाईट्स' करेल मदत

Travel Tips : गुगल फ्लाईट्स या आठवड्यात काही नवीन फीचर्स लाँच करणार आहे.
Google Flights Feature
Google Flights FeatureeSakal

सध्या सुट्ट्यांचा काळ सुरू आहे. त्यामुळे बरेच जण ट्रिपला जाण्याचा, किंवा कामाच्या ठिकाणाहून आपल्या घरी जाण्याचा प्लॅन करत आहेत. बस किंवा रेल्वेने प्रवास करण्याची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे त्यासाठी लागणारा वेळ. कित्येक जणांना अगदी कमी सुट्ट्या उपलब्ध असतात. त्यातही जर प्रवासातच सगळा वेळ जाणार असेल, तर सुट्टीची मजाच जाते.

अशा वेळी विमान प्रवास हा एक चांगला पर्याय ठरतो. मात्र, विमानाच्या तिकिटांचे दर अगदी महाग असतात. मात्र, तुम्हाला जर स्वस्त फ्लाईट तिकिटांची माहिती आधीच मिळाली तर? यासाठीच तुम्हाला गुगलचं एक खास फीचर मदत करणार आहे. काय आहे हे फीचर? जाणून घेऊया.

Google Flights Feature
Travel News : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता भारतीयांना श्रीलंकेत मिळणार 'व्हिसा फ्री' प्रवेश

गुगल फ्लाईट्स या आठवड्यात काही नवीन फीचर्स लाँच करणार आहे. यामध्ये प्रवाशांना स्वस्तात तिकीट बुक करण्यासाठी मदत होणार आहे. कोणत्या वेळी तिकीट बुक केल्यानंतर ते स्वस्त मिळू शकतं, याबाबत गुगल स्वतःच माहिती देऊ शकेल. (Tech News)

तसंच आपल्याला ज्या दिवशी प्रवास करायचा आहे, त्या दिवशीच्या फ्लाईटसाठी कधी सर्वात स्वस्त किंमत उपलब्ध असेल; याबाबत देखील गुगल माहिती देणार आहे. यासाठी तुम्हाला गुगल फ्लाईट्समधील प्राईज ट्रॅकिंग सिस्टीम ऑन करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला हव्या असणाऱ्या फ्लाईटचं तिकीट स्वस्त झाल्यास गुगल नोटिफिकेशन देईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com