
गुगलने भारतीय विद्यार्थ्यांसाठी AI आधारित Gemini Advanced योजना मोफत सुरू केली आहे.
विद्यार्थी या योजनेतून लेखन, व्हिडिओ, रिसर्च आणि क्लाउड स्टोरेजसारख्या सुविधा मिळवू शकतात.
ही ऑफर उपलब्ध असून अर्ज करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत.
शिक्षणाच्या डिजिटल भविष्याकडे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, गुगलने भारतीय कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. ‘जेमिनी फॉर स्टुडंट्स’ नावाच्या या सवलतीच्या योजनेत, १८ वर्षांवरील पात्र भारतीय विद्यार्थ्यांना ‘Gemini Advanced AI Pro’ सेवा एक वर्षासाठी पूर्णपणे मोफत मिळणार आहे. ही संधी १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध असेल.