तुम्हीसुद्धा Google चा Incognito Mode वापरता का? मग ही असू शकते धोक्याची घंटा; जाणून घ्या सत्य 

incognito mode
incognito mode

नागपूर : आपल्यापैकी प्रत्येक जण Google चा  Incognito मोड वापरत असेलच. आपण ब्राउझ केलेल्या काही वेबसाईट्स आणि हिस्टरी आपल्या फोनमध्ये सेव्ह राहू नये यासाठी आपण  Incognito मोड वापरतो. मात्र हा मोड यूजर्ससाठी धोकादायक सिद्ध होऊ शकतो. अशा परिस्थितीत आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की आपली ऑनलाइन गोपनीयता संरक्षित करण्यासाठी  Incognito मोड हा पर्याय चांगला मुळीच नाही. यामुळे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. 

आपण ब्राउझ करता त्या प्रत्येक गोष्टीचा पत्ता Google ठेवतो. जेव्हा तीन वापरकर्त्यांनी गुगलला कोर्टात खेचले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. Incognito मोडमध्ये ब्राउझ करताना या तिन्ही यूजर्सचा डेटादेखील ट्रॅक केला जात होता. गुगलनं हे खटले रद्द करावे अशी इच्छा दर्शवली होती. याचे कारण अगदी सोपे होते. गूगलचा असा विश्वास होता की लोकांना आधीपासूनच Incognito मोडचा अर्थ माहिती आहे. 

Incognito मोड वापरणार्‍या युजर्सची जागा आणि डेटा कंपनीद्वारे शोधला जात असल्याचा आरोप यूजर्सनी Google वर केला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की कॅलिफोर्नियाचे जिल्हा न्यायाधीश लुसी कोह यांनी असे म्हटले आहे की गूगलने Incognito मोडद्वारे यूजर्सचा वैयक्तिक डेटा गोळा केला आहे आणि त्याबद्दल यूजर्सना माहिती देखील दिली नाही. असे म्हटले जात आहे की गुगलला पाच अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 36,370 कोटी रुपये दंड होऊ शकतो.

गूगलचा असा विश्वास आहे की Incognito मोडचा अर्थ अदृश्य असा नसतो. Chrome यूजर्सकडे असा सामान्य सेन्सर असावा की त्यांचा डेटा ट्रॅक केला जात आहे. कॅलिफोर्नियाच्या न्यायाधीशांनी हे स्पष्ट केले आहे की त्या कंपनीविरूद्ध खटला रद्द करणार नाही. या अहवालात असे म्हटले आहे की अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश ल्युसी कोह यांनी असे म्हटले आहे की Google ने यासाठी यूजर्सना  कोणतीही माहिती दिली नव्हती, कारण ते यूजर्सचा डेटा ट्रॅक करत होते.. मात्र या आरोपावर जोरदारपणे आपला बचाव होईल असे सांगत गुगलने हा आरोप फेटाळून लावला होता.

काय आहे गुगलचे म्हणणे 

गूगलने कोर्टाने फाईलिंग दरम्यान असे सांगितले की Incognito म्हणजे अदृश्य नाही. जर कोणताही यूजर हा मोड वापरुन वेबसाइटला भेट देत असेल तर त्या युजरची माहिती वेबसाइटद्वारे ट्रॅक केली जाते. इतकेच नाही तर त्या वेबसाईटवर असलेल्या थर्ड पार्टी सर्व्हिसेसनाही माहिती मिळते.

यूजर्सना कोणत्याही गतिविधीशिवाय ब्राउझ करण्याची परवानगी देतो. याचा थेट अर्थ असा आहे की या मोडद्वारे यूजर्स आपल्या डिव्हाइस किंवा ब्राउझरमध्ये ऍक्टिव्हिटी  रेकॉर्ड केली जात नाही. या मोडद्वारे, ज्या वेबसाइटवर यूजर्स भेट देत आहेत ती वेबसाइट यूजर्सचा डेटा निश्चितपणे ट्रॅक करते.

डेटा ट्रॅकिंग हा गुगलचा मोठा व्यवसाय 

गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिकेच्या एका यूजरने गुगल त्यांच्या यूजर्सकडून डेटा संकलित करते असा आरोप केला होता.  त्याच वेळी Google ने आधीच जाहीर केले होते की ते आपल्या व्यासपीठावरून तृतीय पक्षाच्या कुकीज काढून टाकतील.मात्र असे करण्यात आले का याबद्दल शंका कायम आहे. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com