लवकरच येणार यू-ट्यूब गो ऍप

वृत्तसंस्था
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

येत्या दोन महिन्यात हे अॅप येणार असून, सध्या हे ऍप मिळविण्यासाठी युजर्सला youtubego.com या संकेतस्थळावर signup करावे लागणार आहे. यासाठी भारतातल्या 15 शहरांमध्ये अभियंते, डिझायनर्स आणि संशोधकांनी सर्वेक्षण केले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.  

नवी दिल्ली - ‘गुगल फॉर इंडिया‘ या कार्यक्रमात व्हिडिओसाठी लोकप्रिय असलेल्या यू ट्यूबने ‘‘यु ट्यूब गो‘‘ हे ऍप लाँच करण्याची घोषणा केली. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअरींग सर्विसबरोबर जोडणे हा या ऍप मागील मुख्य उद्देश आहे.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी युजर्सचा भरमसाठ डेटा खर्च होऊ नये यासाठी, तसेच इंटरनेट कनेक्शन हा व्हिडिओ बघण्यामधील अडथळा होऊ नये यासाठी या ऍपची मदत होणार आहे.

 

काय आहे या ऍपमध्ये..

- यू ट्यूबवरचे व्हिडीयो सेव्ह करून ऑफलाइन पाहता येणार

- स्लो इंटरनेट कनेक्शन असतानाही ऑफलाइन व्हिडीओ सेव्ह करता येणार

- इंटरनेट कनेक्शन नसतानाही व्हिडीयो शेअर करण्याची सोय

- व्हिडीयोचा प्री-व्ह्यू बघता येण्याची सोय

- किती एमबी डेटा घेईल हे देखील व्हिडिओ डाउनलोड करायच्या आधी समजणार

- कोणत्या क्वालिटीचा आणि किती साइजचा व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे हे युजर्स ठरवू शकणार.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google to introduce YouTube go-App