Google Street View भारतात लाँच, पुणे नाशिकमध्ये लवकरच येणार

हे फिचर प्रथम 2007 मध्ये अनेक यूएसमधील शहरांमध्ये लाँच करण्यात आले होते.
Google Street View
Google Street ViewSakal

Google Maps Street View In India : गुगल मॅप्सने अखेर गुगल स्ट्रीट व्ह्यू फीचर भारतातही लाँच केले आहे. या फीचरची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती, कंपनीने 15 वर्षांपूर्वी अमेरिकेत हे फिचर लॉन्च केले होते. या फिचरमुळे वापरकर्त्यांना अधिक चांगल्या प्रकारे या सुविधेचा आनंद घर बसल्या घेता येणार आहे. हे फिचर वर्षाअखेरपर्यंत देशातील 50 शहरांमध्ये सुरू करण्याची गुगलची योजना आहे.

Google Street View
RBI News: बँकांकडे पडून आहेत 48,262 कोटी रुपये; कोणी वालीचं नाही

काय आहे गुगल स्ट्रीट व्ह्यू फीचर

Google स्ट्रीट व्ह्यूव हे एक तंत्रज्ञान आहे जे Google नकाशे आणि Google Earth अॅपद्वारे जगातील अनेक रस्त्यांवरील स्थानांवरून परस्पर पॅनोरामा प्रदान करण्यास मदत करते. हे प्रथम 2007 मध्ये अनेक यूएसमधील शहरांमध्ये लाँच करण्यात आले होते. त्यानंतर आता जगभरातील शहरे आणि ग्रामीण भागांचा समावेश करण्यासाठी त्याचा विस्तार केला जात आहे. ज्या रस्त्यांचे फोटो Google Maps मध्ये उपलब्ध आहेत ते निळ्या रेषेत दाखवण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यांव्यतिरिक्त, या ठिकाणी जागतिक लँडमार्क, संग्रहालये तसेच रेस्टॉरंट्स देखील पाहण्यासाठी तुम्ही गुगल मॅप्समधील स्ट्रीट व्ह्यू फीचरचा वापर करू शकणार आहात.

Google Street View
सुप्रिया सुळेंचा मोदींशी गुजराती भाषेत संवाद.. ऐकून थक्क व्हाल..

भारतात कुठे वापरता येणार Google Street View फिचर

गुगल स्ट्रीट व्ह्यू फीचर सध्या देशातील 10 शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रायोगिक तत्त्वावर याची पहिल्यांदा सुरुवात बंगळुरू येथे सुरू केले जाणार आहे. त्यानंतर दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि अमृतसर या शहरांमध्ये याची सुरुवात केली जाणार आहे. या दहा शहरांमध्ये सुमारे 1,50,000 किलोमीटरचा परीसराचा समावेश करण्यात आला आहे.

Google Street View
अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच! बंडखोर नेत्यांच्या सूचक शुभेच्छा

वर्षा अखेरीस पोहोचणार 50 शहरांमध्ये

गुगलकडून लाँच करण्यात आलेले हे फिचर वर्षा अखेरीस 50 शहरांमध्ये पोहोचवले जाईल. यासाठी गुगलने जेनेसिस इंटरनॅशनल आणि टेक महिंद्रासोबत भागीदारीही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com