युक्रेनच्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पडला रशियन टॅंकवर भारी!

युक्रेनच्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पडला रशियन टॅंकवर भारी!

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात रशियाचे सैनिक हल्ला करत आहेत. पूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे. बॉंब आणि गोळीबाराचे व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. ते पाहून अनेकांना खूपच वाईट वाटते आहे. पण या व्हिडिओमध्ये असेही काही व्हिडिओ आहेत ज्यात युक्रेनियन नागरिक रशियाशी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. या कठीण काळात एक व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) चर्चेचा विषय झाला आहे.

युक्रेनच्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पडला रशियन टॅंकवर भारी!
बाबा वेंगा यांनी रशियासंदर्भात काय भविष्यवाणी केलीये माहितीये?

असा चोरला टॅंक

हा व्हिडिओ (Viral Video)फक्त सात सेकंदांचा आहे. त्यात असे दिसते की, निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरने एक शेतकरी रशियाचा टॅंकर चोरतो आहे. तर, एक माणूस त्याच्या मागे धावताना दिसत आहे. तेथे उपस्थित असलेल्या कोणीतरी हे दृश्य कॅमेऱ्यात चित्रित केले. ट्विटवर हा व्हिडिओ सोमवारी ऑस्ट्रियातील युक्रेनचे राजदूत ऑलेक्झांडर शेरबा यांनी शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले – हे जर खरे असेल तर एका शेतकऱ्याने चोरलेली पहिली टाकी असेल! युक्रेनियन खरोखरच बलवान आहेत.

युक्रेनच्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पडला रशियन टॅंकवर भारी!
कार्टून बघायचं, डोनट्स खायचे! एवढचं करून 'तो' कमावतो लाखोंचा पगार

खूप दिवसांनी हसले लोक

या ट्विटला आतापर्यंत ९२ हजारांहून अधिक लाईक्स आणि १९ हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. तर हा व्हिडिओ 3.2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले - मला आशा आहे की हे खरे आहे. काही लोकं म्हणाली की युद्ध सुरू झाल्यानंतर मी पहिल्यांदाच इतका हसलो आहे.

युक्रेनच्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पडला रशियन टॅंकवर भारी!
मासे खाण्याचा बेत आहे! शिजवण्याआधी फक्त ५ टिप्स लक्षात ठेवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com