Google : गुगल आपल्या यूजर्सना देतंय ६३१ रुपये! अट फक्त एकच; पाहा कसे मिळवाल?

२००६ ते २०१३ या दरम्यान गुगल सर्च केलेल्या व्यक्तींना कंपनी हे पैसे देत आहे.
Google Settlement Money
Google Settlement MoneyeSakal

जर तुम्ही खूप वर्षांपासून गुगल वापरत असाल, तर तुम्हाला ६३१ रुपये मिळण्याची शक्यता आहे. कारण २००६ ते २०१३ या दरम्यान गुगल सर्च केलेल्या व्यक्तींना कंपनी हे पैसे देत आहे. गुगलने आपली सर्च हिस्ट्री विकली असल्याचा आरोप करत कंपनीवर खटला दाखल करण्यात आला होता. याची सेटलमेंट म्हणून गुगल ही रक्कम देत आहे.

आरोपांचे खंडन

गुगलने आपल्यावर असलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. कंपनीने यूजर्सची सर्च हिस्ट्री कोणासोबतही शेअर केली नाही, असं गुगलचं म्हणणं आहे. मात्र, या प्रकरणातून सुटका म्हणून गुगल सुमारे २३ मिलियन डॉलर्सची भरपाई देणार आहे. त्यामुळेच यूजर्सना ही रक्कम देण्यात येणार आहे.

Google Settlement Money
US : अमेरिकेतील शाळेने मेटा, गुगल, स्नॅपचॅटला खेचलं कोर्टात! विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य बिघडवत असल्याचा आरोप

कोणाला मिळणार रक्कम?

जर तुम्ही अमेरिकेतील रहिवासी असाल, आणि २६ ऑक्टोबर २००६ ते ३० सप्टेंबर २०१३ या कालावधीमध्ये गुगलवर काही सर्च केलं असेल, तर तुम्हाला ही रक्कम मिळू शकते. ही राशी मिळवण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. एका यूजरला सुमारे ७.७० डॉलर्स, म्हणजेच जवळपास ६३१ रुपये मिळणार आहेत.

Google Settlement Money
Tech Hacks : गुगल चोरू शकणार नाही तुमचा डेटा, अकाउंटमध्ये करा फक्त 'ही' सेटिंग

अशी मिळवा रक्कम

ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला refererheadersettlement.com या वेबसाईटवर जावं लागेल. याठिकाणी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म मिळेल. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला क्लास मेंबर आयडी मिळेल. यानंतर तुम्हाला सबमिट क्लेम या पेजवर जावं लागेल. या पेजवर आपला क्लास मेंबर आयडी टाकून रक्कम क्लेम करू शकता.

Google Settlement Money
Google Photos : आता गुगल स्वतःच एडिट करून देणार तुमचे फोटो! नवीन फीचर झालं लाँच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com