Google Pay Global Credit Card : ‘गुगल पे’ने लाँच केले 'ग्लोबल क्रेडिट कार्ड' ; आता 'UPI' द्वारे होणार पेमेंट!

Google Pay Launches Its First Global Credit Card: गुगल पेने अ‍ॅक्सिस बँकेच्या सहकार्याने रुपे नेटवर्कवर हे को-ब्रँडेड कार्ड लाँच केले आहे.
Google Pay introduces its first global credit card, allowing users to make secure UPI-based credit card payments across international platforms.

Google Pay introduces its first global credit card, allowing users to make secure UPI-based credit card payments across international platforms.

esakal

Updated on

Google Pay launches its first global credit card with UPI integration : गुगलने अखेर आपले पहिले ग्लोबल क्रेडिट कार्ड लाँच केले आहे आणि विशेष म्हणजे ते सर्वप्रथम भारतात सादर केले आहे. गुगल पेने अ‍ॅक्सिस बँकेच्या सहकार्याने रुपे नेटवर्कवर हे को-ब्रँडेड कार्ड लाँच केले आहे. 

वेगाने वाढणाऱ्या UPI पेमेंट सिस्टमच्या पार्श्वभूमीवर, कंपनीने UPI लिंकिंग देखील सक्षम केले आहे. याचा अर्थ ग्राहक हे कार्ड त्यांच्या UPI खात्याशी लिंक करून दुकाने आणि व्यापाऱ्यांना सहजपणे पेमेंट करू शकतात.

भारतात UPI आणि क्रेडिट कार्डच्या एकत्रित वापराची मागणी वेगाने वाढत आहे. फोनपे, एसबीआय कार्ड्स आणि एचडीएफसी सारख्या प्रमुख कंपन्यांनी आधीच स्वतःचे रुपे कार्ड लाँच केले आहेत. २०१९ मध्ये पेटीएमने हे सर्वप्रथम लाँच केले होते. आता या बाजारात क्रेडिट आणि सुपर. मनी देखील सक्रिय आहेत. आता या स्पर्धेत गुगलचा प्रवेश झाल आहे.

Google Pay introduces its first global credit card, allowing users to make secure UPI-based credit card payments across international platforms.
Tourist Bus Accident : पर्यटकांची मिनी बस चढावरून अचानक जाऊ लागली मागे; तरूणींनी जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या!

या गुगल पे क्रेडिट कार्डचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इन्स्टंट कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स. बहुतेक क्रेडिट कार्ड सामान्यतः महिन्याच्या शेवटी कॅशबॅक देतात, परंतु गुगलने प्रत्येक व्यवहारावर इन्स्टंट रिवॉर्ड्स देऊन ही प्रक्रिया बदलली आहे. गुगलचे वरिष्ठ संचालक शरथ बुलुसु यांनी स्पष्ट केले की ग्राहकांना रिवॉर्ड्स रिडीम करण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कंपनीने या वैशिष्ट्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com