Tourist Bus Accident : पर्यटकांची मिनी बस चढावरून अचानक जाऊ लागली मागे; तरूणींनी जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या!

Tourist mini-bus rolls back in Himachal Pradesh : या थरारक दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
A visual depicting the aftermath of a tourist mini bus accident in Himachal Pradesh, where passengers jumped out to save their lives as the vehicle rolled backwards on a hill road.

A visual depicting the aftermath of a tourist mini bus accident in Himachal Pradesh, where passengers jumped out to save their lives as the vehicle rolled backwards on a hill road.

esakal

Updated on

Tourist Bus Accident on Hill Road : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील डलहौसी या पर्यटनस्थळी एक थरारक दुर्घटना घडली. एका चढा उरून रस्त्यावर उभे असलेले एक पर्यटकांचे वाहन अचानक मागे जाऊ लागले. त्यावेळी पर्यटक गाडीत चढत होते आणि त्यात सात तरुणी होत्या. गाडी मागे मागे जात असल्याचे लक्षात येताच,  या तरूणींनी जीव वाचवण्यासाठी पटापट गाडी बाहेर उड्या मारल्या. सुदैवाने, गाडी झाडाला धडकल्याने थांबली, अन्यथा भीषण दुर्घटना घडली असती.

डलहौसीला भेट देणाऱ्या तरुण पर्यटकांचा एक गट बुधवारी सकाळी पंजपुलाला गेला होता. चालकाने पंजपुला येथील उतारावर रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली होती. पंजपुलाला भेट दिल्यानंतर हा गट खज्जियारकडे निघाला होता. या दरम्यान या गटातील तरुणी त्यांच्या वाहनात चढत असतानाच, त्यांचे वाहन अचानक उतारावरून मागे जाऊ लागले.

ही बाब तरूणींच्या लक्षात येताच त्या वाहनात चढलेल्या तरूणींनी जीव वाचवण्यासाठी पटापट उड्या मारल्या. सुदैवाने ते वाहन रस्त्यालगतच्या एका झाडाला धडकून अडकले आणि दरीत कोसळण्यापासून वाचले. यावेळी एक तरुणीही खड्ड्यात पडली परंतु ती थोडक्यात बचावली. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

A visual depicting the aftermath of a tourist mini bus accident in Himachal Pradesh, where passengers jumped out to save their lives as the vehicle rolled backwards on a hill road.
Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

दरम्यान, पर्यटक गटातील इतर सदस्य आणि स्थानिक रहिवासी तातडीने मदत करण्यासाठी घटनास्थळी धावले. या अपघातात सहा ते सात तरुणी जखमी झाल्या. क्रेनच्या मदतीने खड्ड्यात अडकलेल्या पर्यटकांच्या वाहनालाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, पर्यटक कलाटोप आणि खज्जियारला रवाना झाले. या अपघाताबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com