
Google Pay ने लाँच केलं टॅप टू पे फीचर; पेमेंट करणं होईल आणखी सोप्पं
Google Pay ने टॅप टू पे फीचर (Tap To Pay) लाँच केले आहे. हे फीचर पाइन लॅब्स (Pine Labs)च्या भागीदारीत सुरू करण्यात आले आहे. ही UPI आधारित प्रक्रिया असून या फीचरच्या मदतीने, UPI पेमेंट करणे पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर होईल. आत्तापर्यंत टॅप टू पे फीचर फक्त डेबिट आणि क्रेडीट कार्डसाठी उपलब्ध होते. आता ते यूपीआय पेमेंटसाठी देखील मिळणार आहे.
काय करावे लागेल?
टॅप टू पे फीचर वापरुन पेमेंट पूर्ण करण्यासाठी सर्व वापरकर्त्यांना पॉइंट ऑफ सेल्स (POS) टर्मिनलवर फोन टॅप करावा लागेल. यानंतर फोनवरून पेमेंट ऑथेंटिकेट करावे लागेल. यासाठी युजरला UPI पिन टाकावा लागेल. अशा प्रकारे Google Pay वापरकर्ते व्हर्चुअल पेमेंट करू शकतील. कंपनीचा दावा आहे की टॅप टू पे फीचर QR कोड स्कॅन करणे आणि UPE-लिंक केलेला मोबाइल नंबर एंटर करण्यापेक्षा अधिक सोयीस्कर असेल.
टॅप टू पे फीचर फक्त UPI वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल, जे Pine लॅब्स Android POS टर्मिनलवर देशभरात कुठेही त्यांच्या NFC-इनेबल्ड Android स्मार्टफोनचा वापर करून पेमेंट करू शकतील. ही सुविधा रिलायन्स रिटेल , फ्युचर रिटेल आणि स्टारबक्स मर्चंट्सवर उपलब्ध आहे.
हेही वाचा: Realme C31 लाँचची तारीख कन्फर्म! 'या' दिवशी होणार भारतात दाखल
टॅप टू पे फीचर कसे वापरावे
टॅप टू पे फीचरसाठी, फोनमध्ये NFC फीचर असणे आवश्यक आहे. तो वापरण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये NFC ऑप्शन चालू केलेला असणे आवश्यक आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमचा फोन अनलॉक करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला POS टर्मिनलजवळ जाऊन फोनवर टॅप करावे लागेल.
त्यानंतर Google Pay आपोआप उघडेल.
त्यानंतर पेमेंट कन्फर्म करावे लागेल. त्यानंतर UPI पिन टाकावा लागेल.
त्यानंतर तुमचे पेमेंट पूर्ण होईल.
हेही वाचा: लवकरच येतेय Mahindra ची स्वस्त इलेक्ट्रिक कार; काय असेल किंमत?
Web Title: Google Pay Launches Tap To Pay Feature For Upi Check How To Use And Other Details Here
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..