Malware : गुगलच्या प्ले-स्टोअरवरुन वर्षभरात 60 कोटींहून अधिक मालवेअर डाऊनलोड; तुमच्या फोनमध्ये नाहीत ना 'हे' अ‍ॅप्स?

Play Store Malware Apps : जगातील अग्रगण्य सायबर सिक्युरिटी आणि अँटी व्हायरस फर्म असणाऱ्या कास्परस्कायने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
Play Store Malware Apps
Play Store Malware AppseSakal

गुगलच्या प्ले-स्टोअरवर शक्यतो सुरक्षित अ‍ॅप्स असतात. मात्र तरीही प्लेस्टोअरच्या सुरक्षेला भेदून काही मालवेअर आणि धोकादायक अ‍ॅप्स याठिकाणी प्रवेश करतातच. 2023 या वर्षामध्ये प्ले स्टोअरवरुन तब्बल 60 कोटींहून अधिक वेळा मालवेअर डाऊनलोड केले गेल्याचं एका अहवालात समोर आलं आहे.

जगातील अग्रगण्य सायबर सिक्युरिटी आणि अँटी व्हायरस फर्म असणाऱ्या कास्परस्कायने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गुगलच्या सुरक्षेला भेदण्यासाठी डेव्हलपर्स नवनवीन पद्धती शोधत आहेत. यामुळेच प्ले-स्टोअरवर बऱ्याच वेळा धोकादायक अ‍ॅप्स उपलब्ध होत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

कोणत्या अ‍ॅप्सचा समावेश?

धोकादायक अ‍ॅप्समध्ये सर्वाधिक प्रमाणात इन-अ‍ॅप मिनि गेम्स जाहिराती असणारे अ‍ॅप्स होते. असे अ‍ॅप्स सुमारे 45 कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड केले गेले आहेत. स्पिनओके नावाचा मालवेअर तर प्लेस्टोअरवरील तब्बल 100 हून अधिक अ‍ॅप्समध्ये आढळून आला. हे सर्व मालवेअर यूजर्सच्या फोनमधील डेटा गोळा करुन तो हॅकर्सकडे पोहोचवत आहेत.

Play Store Malware Apps
Cyber Fraud : 82 टक्के भारतीय करतात धोकादायक लिंकवर क्लिक, धक्कादायक रिपोर्ट समोर; 'या' मेसेजपासून रहा सावध!

माईनक्राफ्ट गेमचं क्लोन व्हर्जन

मालवेअर असलेल्या अ‍ॅप्समध्ये माईनक्राफ्ट या गेमच्या अ‍ॅड-फ्री क्लोन व्हर्जनचा देखील समावेश आहे. या अ‍ॅपला तब्बल 35 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे. प्ले स्टोअरवर विविध प्रकारच्या 39 माईनक्राफ्ट गेम असल्याचं देखील स्पष्ट झालं आहे. (Tech News)

यासोबतच iRecorder नावाचं एक स्क्रीन रेकॉर्डिंग अ‍ॅपदेखील यूजर्सचा डेटा चोरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे अ‍ॅप दर 15 मिनिटांनी मोबाईलमधील मायक्रोफोन अ‍ॅक्टिवेट करुन आजूबाजूचा साऊंड रेकॉर्ड करतं, आणि ते आपल्या सर्व्हरला पाठवतं. यालाही 50 हजारांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com