esakal | Work From Home मुळे गुगलचे वाचले हजारो कोटी

बोलून बातमी शोधा

Work From Home मुळे गुगलचे वाचले हजारो कोटी

गूगल या वर्षाअखेरीस ऑफिस पुन्हा सुरु करण्याचा विचार करत आहे.

Work From Home मुळे गुगलचे वाचले हजारो कोटी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - जगभरात कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु केलं आहे. गुगलसारख्या टॉप कंपन्यांनीसुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितलं. ऑफिसमधील चांगली सेवा आणि वातावरण यासाठी गुगलची एक वेगळी ओळख आहे. कोरोनाच्या संकट काळात गुगलचे जास्ती जास्त कर्मचारी हे घरातूनच काम करत आहेत. गुगलला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या ट्रॅव्हलिंगचा, हॉटेल बूकिंगचा आणि इतर सुविधांसाठी करावा लागणारा खर्च कमी झाला आहे. गुगलने यादरम्यान प्रत्यक्ष प्रमोशनसाठीचा खर्चही वाचवला आहे. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटनं गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा तब्बल 1980 कोटी रुपयांची बचत केली. हा सर्व खर्च कंपनीला प्रमोशन, प्रवास, मनोरंजन इत्यादीसाठी करावा लागत होता. असंच जर पुढच्या वर्षभराचा खर्च वाचला तर तो जवळपास 7 हजार 400 कोटी रुपये इतका असेल.

हेही वाचा: प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन

अल्फाबेटने यंदाच्या त्यांच्या वार्षिक अहवालात म्हटलं की, 2020 मध्ये कंपनीने जाहीरात आणि प्रमोशनच्या खर्चातून तब्बल 10 हजार कोटी रुपये वाचवले आहेत. कंपनीने कोरोनामुळे त्यांचा खर्च कमी केला. कँपेन रिशेड्युल केलं आणि अनेक कार्यक्रम हे डिजिटल माध्यमातून घेतले. यामुळे कंपनीला प्रवास आणि मनोरंजन यासाठी करावा लागणारा खर्च 2 हजार 700 कोटी रुपयांनी कमी झाला.

गूगल कपंनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मसाज टेबल, कॅटरेड कूजिन्स आणि कॉर्पोरेट रिट्रीटसारख्या सेवा पुरवते. कोरोनामुळे गूगलच्या कर्मचाऱ्यांना या सुविधा वापरता आलेल्या नाहीत. यामुळेही कंपनीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचला आहे.

हेही वाचा: कोरोनाचा उद्रेक तरीही भारताने संयुक्त राष्ट्राची मदत नाकारली

गूगल या वर्षाअखेरीस ऑफिस पुन्हा सुरु करण्याचा विचार करत आहे. गुगलचे मुख्य फायनान्शिअल ऑफिसर रूथ पोराट यांनी सांगितले की, कंपनी एक हायब्रिड मॉडेल योजना तयार करत आहे. यामध्ये कमीत कमी कर्मचारी ऑफिसमध्ये असतील. गुगल जगभरात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं सुरु ठेवणार असल्याचीही माहिती देण्यात आली.