Gmail युझर्ससाठी खुशखूबर, त्यांना आता...

जगभरामध्ये जी मेल (Gmail) वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
Gmail युझर्ससाठी खुशखूबर, त्यांना आता...

मुंबई - जगभरामध्ये जी मेल (Gmail) वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आता गुगलनं आपल्या जी मेलच्या ग्राहकांसाठी एक आगळी वेगळी सुविधा सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सेवा सुरु करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात होती. जी मेलनं युझर्ससाठी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एवढेच नाही तर त्यांना कॉल डिटेल्सही त्यावरुन तपासता येणार आहेत. त्यासाठीच्या आवश्यक त्या सुचनाही गुगलनं जाहीर केल्या आहेत. त्या काय आहेत हे आपण पाहणार आहोत.

गुगलनं (Google) युझर्सला अधिक दर्जेदार सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जी मेल अॅप मधून युझर्सला व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करता येणार आहे. त्यामुळे जे कोणी जी मेलचा वापर करतात त्यांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. (Gmail Video And Audio Call) ही नवी सुविधा युझर्सला उपयोगी पडणार आहे. काही दिवसांपासून त्यावर गुगल रिसर्च करत होते. अखेर त्यांनी ती सुविधा ग्राहकांसाठी लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतूकाचा वर्षावही होत आहे. आजच्या घडीला जगभरात कम्युनिकेशनसाठी जी मेलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कंपनीनं सुरु केलेली ही सुविधा केवळ अँड्रॉईड नव्हे तर इतर सर्व ऑपरेटिंग सेवा असणाऱ्या मोबाईलमध्ये चालणार आहे.

या सुविधेबाबत गुगलनं सप्टेंबरमध्ये घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, आम्ही आमच्या युझर्सला आता ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. त्यानुसार त्यांनी ती सेवा सुरु केली आहे. जी मेल चॅटमध्ये ही सुविधा असणार आहे. या अॅपचा वापर केवळ ऑडिओ व्हिडिओ कॉलिंगसाठी नव्हे तर तुम्हाला आलेल्या मिस कॉलचे डिटेल्सही आपल्याला यातून चेक करता येणार आहे. तुम्हाला याबाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास आपल्या जी मेल वर असणाऱ्या ब्लु बॅनरच्या माध्यमातून त्याविषयी माहिती मिळेल. असेही सांगण्यात आले आहे.

Gmail युझर्ससाठी खुशखूबर, त्यांना आता...
Movie Review; एकदा थोडी घेतली तर बिघडलं कुठं?, सात बायकांचा 'झिम्मा'
Gmail युझर्ससाठी खुशखूबर, त्यांना आता...
Movie Review; पोरकट, बालिश अन् उथळ हेच 'अंतिम - सत्य'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com