esakal | iPhone साठी गुगलचे नवे अपडेट; दोनच टॅपमध्ये डिलीट करा सर्च हिस्ट्री
sakal

बोलून बातमी शोधा

google

दोनच टॅपमध्ये डिलीट होणार गुगल सर्च हिस्ट्री

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

गुगल (Google) कंपनी लवकरच एक नवीन प्रायव्हसी फीचर बाजारात आणत आहे जे अनेकांना चांगलेच आवडणार आहे. एका अधिकृत ब्लॉगच्या मते, गुगल एक सिक्रेट फीचर घेऊन येत आहे जे वापरकर्त्यांना मोबाइलवरील शेवटच्या 15 मिनिटांचा सर्च हिस्ट्री (Google Search History) काही सेंकदातच डिलीट करता येईल. कंपनीचा असा दावा आहे की, हे नवीन टूल आपल्या Google अकाउंटच्या सर्च हिस्ट्रीमध्ये अ‍ॅडिशनल सेक्युरिटी देईल.

गूगल आपल्या आयफोन अ‍ॅपमधील एक फीचर देत आहे जे आपल्याला शेवटच्या 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री फक्त दोन टॅपमध्ये डिलीट करते. हे फीचर सध्या केवळ आयफोन वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. या सोबतच वापरकर्ते तीन, 18 किंवा 36 महिन्यांनंतर वेब हिस्ट्री डिलीट करण्यासाठी Google ची ऑटोमॅटीक सिस्टम प्री-सेट करू शकता, जे वापरकर्त्यांच्या वेब हिस्ट्री (Web History) सुरक्षीत ठेवण्यासाठी अधीक प्रभावीपणे काम करेल.

हे फीचर iPhone साठी गुगल अ‍ॅपवर येत आहे आणि या वर्षाच्या अखेरीस Android वापरकर्त्यांसाठी देखील ते उपलब्ध होईल.

  • iPhone वापरकर्ते अशी करा हिस्ट्री डिलीट

  • आपल्या आयफोनवर Google अ‍ॅप उघडा.

  • पेजच्या वर-उजवीकडे आपले प्रोफाइल आयकन दिसेल त्यावर टॅप करा.

  • “Delete last 15 min” वर टॅप करा.

  • “Search History” बटण टॅप करा आणि दर तीन महिन्यांनी ऑटो-डिलीट सेट करा

आपण Google चे ऑटोमॅटीक डिलीट टूल वापरुन आपली Google वेब आणि अ‍ॅप एक्टीवीटी तुम्हाला हवे तेव्हा हवे तितक्या वेळा क्लिअर करू शकता.

google-update-for-iphone-users-app-can-delete-the-last-15-minutes-search-history-in-two-taps

हेही वाचा: आता WhatsApp वर डिलीट केलेले मेसेजही वाचा, 'हा' आहे मार्ग

loading image