

Google Year In Search:
Sakal
Year End 2025: या वर्षभरात भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेले AI ट्रेंडने लोकप्रियता मिळवली आहे. चॅटजीपीटीपासून ते जेमिनी एआयपर्यंत, देशभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लोकप्रियता प्रचंड वाढली असून यूजर्संच्या सर्च हॅबिट्समध्ये याचा ठसा उमटला आहे. एआयफोटोमएउडिटिंग, डूडल आर्ट, रिअॅलिस्टिक इमेजेस, व्हॉइस-टू-टेक्स्ट, एआय चॅटबॉट्स आणि स्मार्ट असिस्टंट यांसारख्या तंत्रज्ञानांनी भारतीयांना अक्षरशः भुरळ घातली. विशेष म्हणजे जे टूल्स काही वर्षांपूर्वी फक्त टेक-लव्हर्समध्ये लोकप्रिय होते, ती आता सामान्य यूजर्संच्या दैनंदिन गरजेचा भाग बनली आहेत. विविध एआय फोटो ट्रेंड्स, पर्सनलाइज्ड प्रॉम्प्ट्स आणि व्हायरल जनरेटिव्ह एआय फिचर्समुळे Google सर्चवर संबंधित शोधांमध्ये प्रचंड वाढ झाली.