Loan App Banned : भारत सरकारची कारवाई! लोन ॲप्स का केलेत बॅन? वाचून बसेल धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Loan App Banned

Loan App Banned: भारत सरकारची कारवाई! लोन ॲप्स का केलेत बॅन? वाचून बसेल धक्का

Loan App Banned : काही दिवसांपूर्वी, भारत सरकारने सर्व कर्ज आणि सट्टेबाजी अॅप्सवर बंदी घातली आहे, ज्यांची संख्या शेकडो आहे. वापरकर्ते यापुढे गुगल प्ले स्टोअरवरून हे अॅप्स डाउनलोड करू शकणार नाहीत. असे करण्यामागे नक्की कारण तेदेखील शासनाने सांगितले. ते वाचून तुम्हालाही धक्काच बसेल.

हे अॅप्स चीनशी संबंधित असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. यामुळेच ते जलद काढण्यात आले आणि आता कोणीही ते डाउनलोड करू शकत नाही. भारत सरकारने पुन्हा एकदा 138 बेटिंग आणि 94 कर्ज देणार्‍या अॅप्सवर बंदी घातली आहे आणि हे करण्यामागे महत्वाचे कारण आहे.

या Loan आणि Betting ॲप्सवर बंदी

तुम्हाला कदाचित हे कळल्यावर आश्चर्य वाटेल की, इलेक्ट्रॉनिक्स अँड इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या अॅप्सवर बंदी घालण्यात येणार होती, त्यात PayU सोबत Kisht, IndiaBulls, Faircent आणि LazyPay यांचा समावेश आहे. सरकारने त्यांना स्वतः प्रमाणित करण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला असला तरी त्यात स्पष्ट अहवाल दिल्यानंतर कंपन्यांवरील बंदी मागे घेण्यात आली आहे.

Loan App Banned

Loan App Banned

सर्व कंपन्यांना एक आठवड्याचा कामकाजाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. देशात बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सवर आयटी कायद्याचे कलम 69 लागू करण्यात आले आहे. LazyPay, Kissht, indiabullshomeloans, buddyloan, Faircent, KreditBee आणि mPokket वरून बंदी उठवण्यात आली आहे कारण या कंपन्यांनी त्यांचे योग्य कामकाजाचे अहवाल सादर केले आहेत.

भारतीय वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने उचललेले पाऊल अत्यंत प्रशंसनीय आहे. या स्टेपनंतर आता युजर्स न घाबरता लोन अॅप वापरू शकतात आणि त्यांना त्यांच्या खात्याच्या सुरक्षिततेची भीती वाटणार नाही.

चीनबद्दल सांगितले जात असलेल्या अॅप्सवरून कर्जासाठी अर्ज करणे खूप धोक्याचे आहे, कारण तुमची वैयक्तिक माहिती त्यावर सुरक्षित नाही आणि माहिती इतर प्लॅटफॉर्मवर विकली जाते, अशा परिस्थितीत भारत सरकारने कठोर कारवाई केली आहे. यूजर्स सुरक्षित पद्धतीने कर्जासाठी अर्ज करू शकतील यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.