

How to use E-Aadhaar App on mobile
esakal
E-Aadhaar App : भारत सरकार लवकरच एक क्रांतिकारी पाऊल उचलत आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) 'ई-आधार' नावाचे नवीन मोबाईल अॅप लाँच करणार आहे. या अॅपमुळे लाखो नागरिकांना आधार केंद्रांच्या लांब रांगा आणि वाट पाहण्याचा त्रास कायमचा संपेल. आता तुमच्या स्मार्टफोनवरूनच जन्मतारीख, निवासी पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे. हे अॅप एआय आणि फेस आयडी तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने, अपडेट प्रक्रिया फास्ट, सुरक्षित आणि सोपी होणार आहे.