esakal
विज्ञान-तंत्र
Mobile App Tips : मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करताना घ्या 'ही' काळजी; नाहीतर हॅकिंग होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही
सरकारने मोबाईल अॅप डाऊनलोड करताना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे ही खबरदारी अत्यंत आवश्यक बनली आहे.
थोडक्यात..
सरकारने मोबाईल अॅप्स डाऊनलोड करताना फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
अधिकृत अॅप स्टोअरवरूनच अॅप्स डाऊनलोड करण्याचे सरकारचे निर्देश आहेत.
अॅप्सना फक्त आवश्यक परवानग्या देऊन वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवावी.
देशातील लाखो स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सरकारने महत्त्वाचा इशारा दिला आहे. मोबाईलमध्ये अॅप्स डाऊनलोड करताना काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला असून, बनावट अॅप्समुळे लोकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा सरकारचा इशारा आहे.