Firefox Browser Warning : मोझिला फायरफॉक्स ब्राउजर वापरताय? आरामात चोरी होऊ शकतो तुमचा डेटा; सरकारचा गंभीर इशारा

Mozilla Firefox Browser : या ब्राउजरच्या ठराविक व्हर्जनमध्ये असे बग्स आढळले आहेत.
Firefox Browser Warning
Firefox Browser WarningeSakal

Firefox Browser Data Theft : जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये मोझिला फायरफॉक्स हे ब्राऊजर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या ब्राउजरच्या ठराविक व्हर्जनमध्ये असे बग्स आढळले आहेत, ज्यामुळे तुमचं डिव्हाईस हॅक होण्याचा धोका वाढतोय. सरकारने याबाबत इशारा दिला आहे.

सरकारच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने याबाबत माहिती दिली आहे. Firefox ESR 115.5.0 यापूर्वीचे व्हर्जन्स, Mozilla Thunderbird 115.5 यापूर्वीचे व्हर्जन्स आणि Firefox iOS 120 यापूर्वीचे व्हर्जन्स वापरणं धोकादायक असल्याचं CERT-In ने म्हटलं आहे.

काय आहे धोका?

या ब्राउजर व्हर्जन्समध्ये असणाऱ्या बग्समुळे फोन किंवा कम्प्युटरमध्ये मालवेअर आरामात प्रवेश करू शकतात. यामुळेच यूजर्सचा गोपनीय डेटा, बँकिंग डीटेल्स किंवा अशी बरीच माहिती चोरी होऊ शकते. यामुळेच सरकारने याबाबत खबरदारीचा इशारा दिला आहे. (Tech News)

Firefox Browser Warning
Google Drive : गुगल ड्राईव्हमधून आपोआप डिलीट होतोय डेटा; कंपनीने दिला यूजर्सना इशारा

असा करा बचाव

हॅकिंगच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला फायरफॉक्स ब्राउजर वापरणं बंद करण्याची गरज नाही. यासाठी केवळ तुम्हाला तुमचं ब्राउजर अपडेट करावं लागणार आहे. नवीन व्हर्जनमध्ये असणाऱ्या बग फिक्सेसमुळे डेटा चोरी होण्याचा धोका कमी होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com