Apple Warning : सॅमसंगनंतर आता अ‍ॅपल यूजर्सना सरकारचा इशारा; त्वरीत करा 'हे' काम

CERT-In Warning : आयफोनमधील आयओएस, अ‍ॅपल वॉच ओएस, आयपॅड ओएस आणि अ‍ॅपल सफारी अशा सर्व गोष्टींसाठी सरकारने हा इशारा दिला आहे.
Govt Warns Apple Users
Govt Warns Apple UserseSakal

Apple Users Warning : भारतीय कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, म्हणजेच CERT-In ने काही दिवसांपूर्वी देशातील सॅमसंग यूजर्सना डेटा सुरक्षेबाबत इशारा दिला होता. आता अशाच प्रकारचा इशारा या संस्थेने अ‍ॅपल कंपनीबाबत देखील दिला आहे.

आयफोनमधील आयओएस, अ‍ॅपल वॉच ओएस, आयपॅड ओएस आणि अ‍ॅपल सफारी अशा सर्व गोष्टींसाठी सरकारने हा इशारा दिला आहे. याबाबत तातडीने कारवाई न केल्यास, डिव्हाईस हॅक होऊन त्यातील डेटा चोरी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोणत्या डिव्हाईसना धोका?

अ‍ॅपलच्या 17.2 OS यापूर्वीच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या सर्व व्हर्जन्ससाठी हा इशारा जारी करण्यात आला आहे. जुन्या व्हर्जनमध्ये असणाऱ्या एका त्रुटीमुळे हॅकर्स सिक्युरिटी ओलांडून डिव्हाईसमध्ये शिरत असल्याचं समोर आलं आहे. यामुळेच सर्व यूजर्सना आपल्या अ‍ॅपल डिव्हाईसची ऑपरेटिंग सिस्टीम त्वरीत अपडेट करुन घेण्याचं आवाहन CERT-In ने केलं आहे.

Govt Warns Apple Users
Samsung Alert : सॅमसंगचे फोन वापरणाऱ्यांना मोदी सरकारचा गंभीर इशारा; त्वरीत करा 'हे' काम..

आधीही दिले इशारे

या संस्थेने गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये विविध डिव्हाईसबाबत इशारा दिला आहे. सॅमसंगचे जे फोन अँड्रॉईड 11,12,13,14 या व्हर्जनवर आहेत, त्या सर्वांनी आपली ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करून घ्यावी असं सरकारने सांगितलं होतं.

यासोबतच गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एज या दोन ब्राऊजर्सबाबत देखील अशाच प्रकारचा इशारा देण्यात आला आहे. हे ब्राऊजर अपडेट करून घेण्याचा सल्ला सीईआरटीने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com