लवकरच स्मार्टफोन बनणार तुमची 'युनिव्हर्सल ओळख'; UIDAI कडून काम सुरु | Universal Authenticator | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

smartphone

लवकरच स्मार्टफोन बनणार तुमची 'युनिव्हर्सल ओळख'; UIDAI चे काम सुरु

सध्या युनिक आयडेंटिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून एका मोठ्या योजनेवर काम सुरु आहे. या योजनेत युजर्सचा स्मार्टफोन हा युनिव्हर्सल ऑथेंटिकेटर म्हणून वापरता येणार आहे. UIDAI चे CEO सौरभ गर्ग म्हणाले की, सध्या, फिंगरप्रिंट्स, आयरिश स्कॅन आणि वन-टाइम पासवर्ड (OTP) व्हेरिफीकेशन वापरले जातात आणि त्याची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्मार्टफोन सार्वत्रिक व्हेरिफायर म्हणून कसा विकसित होऊ शकतो हे आम्ही पाहत आहोत. या दिशेने काम सुरू आहे.

सोप्या भाषेत सांगायचे तर, रेशन आणि पेन्शन सारख्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना सध्या बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन करावे लागते. पण लवकरच त्याच्या जागी स्मार्टफोन वापरता येणार आहे. यासाठी UIDAI युनिव्हर्सल ऑथेंटिकेशन प्रमाणे तुमचा स्मार्टफोन विकसित करण्यावर काम करत आहे. गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच हा स्मार्टफोन युनिव्हर्सल ऑथेंटिकेटर म्हणून विकसित केला जाईल. यानंतर शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी लोकांना कार्यालये किंवा अन्य कोणत्याही शासकीय संस्थेच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. आधार कार्ड धारक व्यक्ती घरबसल्या स्मार्टफोनवरून आधार कार्डचे व्हेरिफीकेशन करू शकतील.

हेही वाचा: नेमके कोणते चलन असते 'प्रायव्हेट क्रिप्टोकरंसी'? जाणून घ्या

ऑथेंटिकेटर म्हणून स्मार्टफोन कुठे वापरता येईल?

  • बँक खाते उघडताना

  • रेशन कार्ड बनवताना आणि रेशन घेताना

  • नवीन मोबाईल कनेक्शन घेते वेळी

  • पेन्शन घेताना

  • dll करण्यासाठी

  • पॅन लिंकिंग मध्ये

हेही वाचा: कमी बजेटमध्ये 7 सीटर फॅमिली कार शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

सध्या एकूण 120 कोटी मोबाईल कनेक्शन असून यापैकी 80 कोटी स्मार्टफोन ऑथेंटिकेटर म्हणून वापरले जाऊ शकतात. स्मार्टफोन ऑथेंटिकेटर म्हणून कसा वापरला जाऊ शकतो याबद्दल कोणतीही अतिरिक्त माहिती देण्यात आलेली नाही.

सुरक्षेचे काय?

मात्र स्मार्टफोनला आधार ऑथेंटिकेटर बनवण्याच्या प्रयत्नात सुरक्षा हा मोठा अडथळा ठरू शकतो. आधार डायरेक्ट बेनिफीट ट्रांसफर (DBT) योजनांशी जोडलेले आहे. यामुळे सुमारे 2 लाख कोटी रुपयांची फसवणूक रोखण्यात मदत झाली आहे. बँकिंग आणि टेलिकॉम उद्योगाद्वारे केवायसी अपडेटसाठी आधार क्रमांकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. देशातील सुमारे 70 कोटी लोकसंख्या आणि निम्म्याहून अधिक बँक खाती आधारशी जोडलेली आहेत. तर 3 कोटी पेन्शन खात्यांसाठी 10 कोटींची रक्कम आधार पडताळणीनंतरच दिली जाते.

loading image
go to top