‘हँग’ झाले ‘आऊट’ आता वापरा ‘गुगल चॅट’

गुगल हँगआऊट’च्या सर्व आवृत्त्या बंद हँगआऊटची जागा आता ‘गुगल चॅट’ने घेतली आहे.
Google Chat
Google Chatsakal

‘गुगल हँगआऊट’च्या सर्व आवृत्त्या बंद करण्याबाबत अॅपद्वारे गुगल यूजर्सना माहिती देत ​​आहे. यावरील डाटा देखील डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. मात्र, डाटा डाउनलोड करण्यासाठी १ जानेवारी २०२३ पर्यंत युजर्सना वेळ दिला गेला आहे. हँगआऊटची जागा आता ‘गुगल चॅट’ने (Google Chat) घेतली आहे.

काही दिवसांपूर्वीच अॅपलच्या अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून गुगल हँगआउट ॲप काढून टाकण्यात आले आहे. ‘हॅंगआऊट’ची वेब आवृत्तीही १ नोव्हेंबरपासून गुगल चॅटमध्ये रुपांतरीत होणार आहे. गुगलने ‘गुगल प्लस’सह ‘हँगआऊट’ २०१३ मध्ये लॉन्च केले होते. हे लक्षात असू द्या की, समजा जर युजर्सनी ‘हँगआऊट’वरील चॅट डिलिट केले तर ते ‘गुगल चॅट’वरूनही डिलिट होणार आहे.

त्यामुळे महत्त्वाचे चॅट डिलिट न करता ते डाऊनलोड करणे गरजेचे आहे. नवीन ‘गुगल चॅट’मध्ये युजर्सना अनेक अत्याधुनिक उपयुक्त असे फिचर्स देण्यात आले आहेत. नवीन अॅप आणि वेब व्हर्जनमध्ये यूजर्सना चॅटिंगसाठी ‘जीआयएफ’ (GIF) आणि इमोजीची सुविधाही उपल्बध आहे. गुगलने २०१३ मध्ये ‘गुगल प्लस’ हे खास फिचर म्हणून यूजर्सना भेट दिले होते.

त्यानंतर गुगल हँगआऊट आणले. मात्र, या वर्षी मार्चमध्ये गुगल प्ले स्टोअर व ॲपलच्या ॲप स्टोअरवरून हॅंगआऊट काढून टाकले होते, तरीही ज्यांच्याकडे आधीपासून हे अॅप होते ते अजूनही सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com