
Harley Davidsonची कमाल! Royal Enfield ला देणार टक्कर, लाँच केली आपली सगळ्यात स्वस्त बाईक
Harley-Davidson X350 : एचडी ची बाइक हे फक्त तरुणांचंच नाही तर बहुतेक प्रौढांचही स्वप्न असतं. ही बाइक आपल्याकडे असावी किंवा निदान चालवायला तरी मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण या बाइक्सच्या किंमती प्रत्येकच्या आवाक्यातल्या नसल्याने बहुतेकांचं हे फक्त स्वप्नच राहून जातं. आपण आता, हे स्वप्न सत्यात उतरू शकतं. जगभरात आपल्या दमदार परफॉर्मंससाठी प्रसिद्ध असणारी एचडी ने आपली आजवरची सर्वात स्वस्क मोटरसायकल Harley-Davidson X350 आता जगासमोर आणली आहे. बाजारात आल्यावर ही बाइक Royal Enfield ला टक्कर देईल.
किंमत
हार्ले डेव्हिडसनने अधिकृतरित्या चीनी बाजारात आपली पहिली 350 CC मोटरसायकल X350 लाँच केलं आहे.
आकर्षक लूक आणि दमदार इंजीन क्षमता असणारी ही बाइक ३३ हजार युआन (चीनी चलन) ठरवण्यात आले आहे.
भारतीय रुपयांत सांगायचे म्हटले तर साधारण ३.९३ लाख रुपये किंमत असणार आहे.
फीचर्स
X350 या मॉडेल मध्ये ब्रांडचा के वी-ट्वीन इंजीन नाही. या ऐवजी QJ Motor कडीन सोर्स करण्यात आलेले 350CC क्षमतेचे पॅरेलल ट्वीन इंजीन वापरण्यात आलेले आहे.
बाइकचा लूक बहुतांश स्पोर्टस्टार XR1200X सारख वाटतं. जे भारतात डिस्कंटीन्यू करण्यात आलं आहे.
फ्रंटला ऑफ सेट सिंहल पॉड कंसोल सोबत सर्क्युलर हेडलँप आहे.
फ्युएल टँक - टीयर ड्रॉप शेप, १३.५ लीटर, XR1200X सारखा आहे.
एलइडी हेडलँप आणि टेललँप आहे.
हेडलाइटवर हार्लेचा लोगो देण्यात आला आहे.
इंजीन क्षमता आणि मायलेज
X350 मध्ये QJ Motor कडीन सोर्स करण्यात आलेले 350CC क्षमतेचे पॅरेलल ट्वीन इंजीन वापरण्यात आलेले आहे.
याची पावर 36.7PS आहे. आणि 31Nm चा टॉर्क जनरेट करतो.
6 स्पीड गीयरबॉक्सने जोडला आहे.
भारतात विकल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्ड 350CC बाइकच्या तुलनेत ही पावर बरीच जास्त आहे.
याच्या फ्रंटला 41mm अपसाइड-डाउन फोर्क रिबाउंड अॅडजस्टेबिलीटी आणि मागच्या बाजूस पिरीलोड रिबाउंड अॅडजस्टेबिलीटीसोबत मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे.
ड्युएल चॅनल अँटी लॉक ब्रेकींग सिस्टम (ABS)
मायलेज - 20.2 किलोमीटर प्रती लीटर
वजन - 180 किलोग्रॅम
भारतात कधी होणार लाँच?
भारतात एचडीचे चाहते कमी नाहीत. पण अद्याप ही बाइक भारतात लाँच होणार की, नाही याविषयी कोणतीही अधिकृत माहिती नाही.
पण चीनी मार्केटमध्ये ज्या किंमतीत ही बाइक लाँच केली केली त्यानुसार याला भारतात चांगला प्रतिसाद मिळू शकेल.