
कोरोनाच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे Harley-Davidson कंपनीला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. बाईकची विक्री कमी झाल्यामुळे आता कंपनीने भारतातून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली: Harley-Davidson बाईकने जगभरातील लोकांना भुरळ घातली आहे. स्टाईल, डिझाईन आणि पॉवर या गुणांनी परिपूर्ण अशी ही बाईक आहे. Harley-Davidson कंपनीचे जाळे जगभरात पसरलेले आहे. अनेक देशांमध्ये या बाईकची विक्री आणि निर्मिती सुरु आहे. मात्र आता भारताबाबत या कंपनीने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे Harley-Davidson कंपनीला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. बाईकची विक्री कमी झाल्यामुळे आता कंपनीने भारतातून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व
गेल्या अनेक वर्षांपासून Harley-Davidson ही क्रुझर बाईक बनवणारी कंपनी भारतात जोमात सुरु होती. भारतात व्यवसाय आणल्यानंतर या कंपनीला बराच फायदा झाला होता. मात्र कालांतराने बाईक्सची किंमत वाढल्यामुळे विक्री मंदावत गेली.
विक्रीत अशी झाली घट
2018 साली Harley-Davidson च्या तब्बल 3,413 बाईक विकल्या गेल्या. मात्र 2019 साली विक्रीत तब्बल 22 टक्क्यांनी घट झाली. 2019 साली केवळ 2676 बाईक्सची विक्री झाली. तर 2019-20 आर्थिक वर्षात 2,500 पेक्षाही कमी बाईक विकल्या गेल्या. त्यामुळे कंपनी भारतात चांगलीच आर्थिक संकटात सापडली.
नक्की वाचा - त्यांना कळतो केवळ माणुसकीचा धर्म; ज्याच्या त्याच्या धर्मानुसार देतात अंतिम निरोप
Harley-Davidson कंपनीने आपला भारत सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र आता याचा सर्वाधिक फटका या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. गाशा गुंडाळ्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. हरियाणातील बवालमध्ये कंपनीचे युनिट आहे. इथे तब्बल 70-80 कर्मचारी आहेत ज्यांची नोकरी आता जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्या देशांमध्ये कंपनीला अपेक्षेपेक्षा जास्त नफा होत नाही अशा देशांमधील सर्व युनिट बंद करण्याचा निर्णय आता कंपनीने घेतला आहे.