

Hero HF Deluxe 100cc bike price specifications
esakal
मुंबई, पुणे किंवा छोट्या गावातील रस्त्यांवरून रोज ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येकाला हवी असते ती विश्वासार्ह, कमी खर्चाची आणि साधी सिम्पल बाइक. हिरो मोटोकॉर्पने याच गरजेला लक्षात घेऊन हिरो एचएफ डिलक्स २०२५ (Hero HF Deluxe 100cc) लाँच केली आहे. ही १०० सीसीची कम्युटर बाइक आहे जी कमी इंधन खर्च, सोपी देखभाल आणि आरामदायी राइडिंग या तीन गोष्टींवर भर देते. नवीन मॉडेलमध्ये फ्यूल इंजेक्शन, i3S टेक्नॉलॉजी आणि साइडस्टँड कटऑफ सारख्या उपयुक्त फीचर्सचा समावेश आहे.