नेतेमंडळींची लाडकी अँबेसेडर आता परत येतीय; नव्या रूपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ambassador car

नेतेमंडळींची लाडकी अँबेसेडर आता परत येतीय; नव्या रूपात

'ओल्ड इज गोल्ड' ही कन्सेप मार्केटमध्ये भलतीच ट्रेंड होत आहे. जून्या गोष्टींना थोडा हटके अंदाज देऊन फॅशन म्हणून ती मार्केटमध्ये उतरवली जाते. याच सिरीजमध्ये आता अँबेसेडरची सुद्धा एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा: वाद हनुमान जन्मस्थळाचा; पण साधूचं भिडले, नाशकात 'खुर्ची'वरून वादंग

एक काळ होता जेव्हा अँबेसेडर ही रॉयल कार मानली जायची. जी त्यावेळच्या श्रीमंत, पुढारी, सेलिब्रिटी लोकांकडे हमखास पाहिली जायची. एखाद्या गावात किंवा वस्तीत अँबेसेडर कार येणं म्हणजे कुठली तरी मोठी हस्ती येण्याची निशाणी मानली जायची. पंतप्रधानांपासून ते डीएमपर्यंत, एसडीएम या गाडीवर फिरायचे.

हेही वाचा: सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? दिलीप वळसे पाटील स्पष्टच बोलले

पण जसं जशी टेक्नॉलॉजी आली आधुनिक गाड्यांनी अख्ख मार्केट आपल्या हातात घेतलं. ज्यामूळं अँबेसेडरची हवा हळू-हळू बाजारातून निघूण गेली. त्यांची मागणी कमी झाली आणि नंतर २०१४ मध्ये तर कंपनीने त्यांचं उत्पादन बंद करून टाकलं.

पण आता ही रॉयल सवारी पुन्हा एकदा मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे. माहितीनूसार अँबेसेडर कार बनवणारी कंपनी हिंदूस्थान इलेक्ट्रिक गाड्यांच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करून एन्ट्री करण्याचा प्लॅन तयार करत आहे.

हेही वाचा: दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या

ऑटो इंडस्ट्रीमध्ये अलीकडच्या काळात मोठा बदल पहायला मिळत आहे. पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किमतीमूळे लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. त्यामूळे बहुतेक मोठ्या कंपन्या सुद्धा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. याच साखळीत भारतातील पहिली कार निर्माता कंपनी हिंदुस्तान मोटर्स सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांसोबत मार्केटमध्ये उतरण्याची तयारी करत असल्याचं समजतयं.

हेही वाचा: काँग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल भाजपात; प्रवेशाची तारीखही ठरली!

मीडिया रिपोर्ट्सनुसार,हिंदुस्तान मोटर्सने युरोपीयन ऑटो कंपनीसोबत हातमिळवणी करून इलेक्ट्रिक इंडस्ट्रीमध्ये आपला व्यवसाय पुन्हा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनूसार हिंदुस्थान मोटर्सने १९५७ मध्ये ब्रिटीश मोटार कंपनीच्या लोकप्रिय कार मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज ३ वरून अँबेसेडर लॉन्च केली होती. उत्तरपारा येथील प्लांटमध्ये या कारचे उत्पादन सुरू झाले, जे ५८ वर्षांपर्यंत म्हणजे अँबेसेडरच्या उत्पादनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत याचं प्लांटमध्ये होत राहिले.

हेही वाचा: सायकलप्रेमींसाठी Ducati MG20 ईलेक्ट्रीक सायकल लॉन्च

अँबेसेडरच्या उत्पादनानंतर काही काळातचं ही कार सगळ्यांची लाडकी बनली. तिला 'King Of Indian Roads'म्हंटल जाऊ लागलं. ८० च्या दशकापर्यंत भारतातील रस्त्यांवर अँबेसेडरनं एक प्रकारची दहशक बनवली होती. बहुतेक अँबेसेडर गाड्यांवर लाल-निळ्या रंगाचा दिवा असायचा. अँबेसेडर अधिकारी आणि राजकारण्यांची एक ओळख बनलेली. या कारमध्ये १.५ लीटर आणि २.० लीटर पॉवरफुल डिझेल इंजिन आणि १.८ लीटर पेट्रोल इंजिन असायचे. त्याचे इंजिन आजच्या कोणत्याही SUV पेक्षा कमी नव्हते.

हेही वाचा: '...मग महाविकास आघाडीत काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार का?'

बरीच वर्षे बादशाह बनून राहिलेल्या या अँबेसेडरला टक्कर दिली ती मारुतीने. कंपनीने जपानच्या सुझूकी मोटारसोबत मिळून ८००ccची स्वस्तात मस्त कार लॉन्च केली. याचा परिणाम अँबेसेडरवर झाला आणि त्याची मागणी कमी होऊ लागली. त्यात बाकीच्या आधूनिक कारची एन्ट्री झाली, ज्यानंतर २०१४ मध्ये तर कंपनीने अँबेसेडरचं प्रोडक्शनचं बंद केलं.

Web Title: Hindustan Motors Ambassador Car Is Back With New Look

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top