Holi Offer : टेलीकॉम कंपनी Vodafone Idea ने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी होळी 2023 साठी एक नवी ऑफर आणली आहे . या ऑफर अंतर्गत, कंपनीकडून यूजर्सना 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा दिला जाईल. पण मग हा फ्री डेटा मिळवणार कसा? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. यात तुम्हाला फ्री डेटा मिळवण्यासाठी काय करता येईल याची संपूर्ण माहिती मिळेल.
Vi 1449 Plan Details
1449 रुपयांच्या या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. हा प्लान 180 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानचा रिचार्ज केल्यावर तुम्हाला 50 जीबी एक्सट्रा डेटाचा लाभ मिळेल.
Vi 1799 Plan Details
1799 रुपयांच्या व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये 24 जीबी हायस्पीड डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 एसएमएस मिळतात. तुम्हाला हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. या प्लॅनचा रिचार्ज केल्यावर तुम्हाला 10 GB एक्स्ट्रा डेटा दिला जाईल.
Vi 2899 Plan Details
2899 रुपयांच्या या प्लानचा रिचार्ज केल्यावर 365 दिवसांच्या वैधतेसह 1.5 GB डेटा दिला जातो. यासोबतच तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस फ्री मिळतात. जर तुम्ही हा दीर्घ वैधता असलेला प्लान खरेदी करत असाल तर तुम्हाला या प्लानमध्ये 75 GB अतिरिक्त डेटाचा फायदा मिळेल.
Vi 3099 Plan Details
3099 रुपयांच्या या प्लॅनमध्ये Vodafone Idea यूजर्सना कोणत्याही नेटवर्कवर दररोज 2 GB हायस्पीड डेटासह मोफत अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला दिवसाला 100 एसएमएस फ्री मिळतात.
3099 रुपयांच्या प्लॅनचा रिचार्ज केल्यावर तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनसह रिचार्ज करणार्या युजर्सना कंपनीकडून 75 जीबी अतिरिक्त हायस्पीड डेटासह Vi अॅपवरून रिचार्ज करण्यावर विनाशुल्क EMI ची सुविधा देखील दिली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.