16GB RAM आणि 108MP कॅमेरा! Honor X9b 5G स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत

16GB RAM आणि 108MP कॅमेरा! Honor X9b 5G स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह लाँच..
16GB RAM आणि 108MP कॅमेरा! Honor X9b 5G स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत

HTech ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Honor X9b लाँच केला आहे. यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो.

या स्मार्टफोनसोबतच, ब्रँडने Honor Choice X5 earbuds आणि Honor Choice Watch लाँच केले आहे. Honor X9b खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील आणि या फोनची विक्री कधी सुरू होईल या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Honor X9b किंमत

कंपनीने हा फोन फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. त्याच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे. Honor X9b या फोनची विक्री ग्राहकांसाठी ई-कॉमर्स साइट Amazon वर 16 फेब्रुवारी 2024 पासून म्हणजेच आज दुपारी 12 वाजता सुरू होईल. यावर, पहिल्या सेलमध्ये ICICI बँक क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांची झटपट सूट मिळेल.

16GB RAM आणि 108MP कॅमेरा! Honor X9b 5G स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत
Xiaomi चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच; 7,299 रुपयांत मिळेल 12GB RAM, फ्लिपकार्ट-अमेझॉनवर विक्रीही सुरू

Honor X9b किंमत

कंपनीने हा फोन फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. त्याच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे. Honor X9b या फोनची विक्री ग्राहकांसाठी ई-कॉमर्स साइट Amazon वर 16 फेब्रुवारी 2024 पासून म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजता सुरू होईल. यावर, पहिल्या सेलमध्ये ICICI बँक क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांची सूट मिळेल.

याशिवाय कंपनी 5000 रुपयांचा अ‍ॅडिशनल एक्सचेंज बोनस देखील देत आहे. ग्राहकांना बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस यापैकी एक निवडावा लागेल. Honor Choice X5 ईयरबड्सची किंमत 1999 रुपये आहे, तर Honor Choice Watch ची किंमत 6,499 रुपये आहे.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

या फोनमध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की हा फोन अँटी-ड्रॉप डिस्प्ले आणि 360 डिग्री प्रोटेक्शनसह येतो.

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो. यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. हँडसेट ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो, ज्याची मेन लेन्स 108MP आहे. याशिवाय 5MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे.

फ्रंटमध्ये कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइसला पावर देण्यासाठी, 5800mAh बॅटरी दिली गेली आहे, जी 35W चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com